शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजार विद्यार्थिनींनी घेतला शिक्षणासाठी एसटीचा मोफत पास, यंदा २ टक्क्यांनी वाढली संख्या

By हणमंत गायकवाड | Updated: July 26, 2023 15:37 IST

सवलतीच्या दरामध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी पास दिला जातो, तर मुलींसाठी मोफत पास आहे.

लातूर : ग्रामीण भागातील मुलींना शहरात शिक्षणाची सोय व्हावी म्हणून अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गत मोफत पास देण्याची योजना राज्य परिवहन महामंडळाकडून राबविण्यात येत आहे. यावर्षी ९१३८ विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ५ वी ते १२वीपर्यंतच्या मुलींना शाळेत, महाविद्यालयांत जाण्यासाठी एसटीने मोफत पासची सोय केली आहे.

यंदा गतवर्षीपेक्षा पास घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या दोन टक्क्यांनी वाढली आहे. अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये आतापर्यंत ९,१३८ मुलींनी पास घेतला आहे, तर सर्वसाधारण ७,६२० विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पास घेतला आहे. सवलतीच्या दरामध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी पास दिला जातो, तर मुलींसाठी मोफत पास आहे.  त्यासाठी आगार प्रमुखांकडून कॅम्पही घेतले जात आहेत.

पास योजनेतूनही एसटीला उत्पन्न...  अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत ५वी ते १२वीच्या मुलींना मोफत पास दिला जातो. या योजनेत जुलै २०२३ पर्यंत लातूर आगारातून १,७८९ मुलींना पास देण्यात आला. यात महामंडळाला ६९ लाख ५६ हजार ६४० रुपये उत्पन्न मिळाले असल्याची माहिती बसस्थानक प्रमुख हनुमंत चपटे यांनी दिली. 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पासची संख्या वाढली...लातूर जिल्ह्यातील पाचही आगारातून गतवर्षीच्या तुलनेत मोफत पासच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे.मागील दोन वर्षे कोरोनामुळे पासेसची संख्या घटली होती. मात्र यावर्षी मोफत पासची संख्या वाढलेली आहे. याचाच अर्थ शाळेतील पट सुधारलेला आहे. 

मुलींना एसटीचा पासलातूर १५८४उदगीर १४१८अहमदपूर १९२०निलंगा २०३१औसा २१८५एकूण ९,१३८

मुलांना एसटीचा पासलातूर २०९१उदगीर १२३७अहमदपूर ११११निलंगा १८५८औसा १३२३एकूण ७,६२०

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूर