शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'अभय'चे निर्भेळ यश; ट्रक चालकाचा मुलगा ‘नीट’मध्ये राज्यात दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 16:23 IST

NEET Exam दिल्लीतील एम्समध्ये मिळविणार अभय चिल्लरगे प्रवेश 

ठळक मुद्देमेंदू विकारतज्ज्ञ व्हायचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाचाही मानस

लातूर : नीट २०२० परीक्षेत लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचा अभय अशोक चिल्लरगे ७०५ गुण मिळवून राज्यात दुसरा आला आहे. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या अभयला ट्रक चालक असलेल्या त्याच्या वडिलांनी सदैव मोठ्या कॉलेजात शिक, असा मोलाचा संदेश दिला होता. तो सार्थ ठरवीत अभयने दिल्लीची वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च एम्स संस्था गाठली आहे. 

अतिशय सामान्य आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या उदगीर येथील चिल्लरगे परिवारातील अभय सर्वात लहान मुलगा. एकूण चार भावंडे. शालेय जीवनापासूनच हुशार असलेल्या अभयने दहावीत ९६ टक्के गुण मिळवीत शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळविला. अकरावी विज्ञान वर्गाच्या सुरुवातीपासूनच त्याने कठोर परिश्रम केले. 

कोरोनासमोर हार नाही... २०२० मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसमोर कोरोनानो विपरीत परिस्थिती निर्माण करून ठेवली. त्यात अभयही होता. तो म्हणाला, महाविद्यालयात सर्वच अभ्यास पूर्ण झाला होता. घरी बसून आॅनलाईन तासिका, सराव परीक्षा हे थोडे नवीन होते. परंतु, जिद्द आणि समोर ठेवलेले ध्येय यश मिळवून देते. 

गुणवत्तेचा चढता आलेख... अभयच्या शिक्षणाचा गुणवत्ता आलेख चढता आहे. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेत तो देशात ८८१ वा क्रमांक मिळवून यशस्वी झाला. तसेच अभियांत्रिकीसाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन्समध्येही ९९.५० पर्सेंटाईल मिळविले होते. या आधारे त्याला देशातील कोणत्याही नामांकित एनआयटीमध्ये प्रवेश मिळू शकतो. 

शिक्षण आणि संशोधन...अभय चिल्लरगे म्हणाला, आता पहिले ध्येय सर्वोच्च एम्स संस्थेत प्रवेश मिळविणे. मेंदू विकारतज्ज्ञ व्हायचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाचाही मानस आहे. दरम्यान, अभयच्या यशाचे संस्थाध्यक्ष माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी कौतुक केले.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालlaturलातूरEducationशिक्षण