महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, लातूरच्या वतीने आयाेजित ऑनलाइन राज्यस्तरीय वेबिनारमध्ये ते ‘भूजल पुनर्भरण काळाजी गरज आणि साक्षरता अभियान’ या विषयावर बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. सिद्राम डाेंगरगे हाेते, तर प्रमुख मार्गदर्शक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा औरंगाबाद येथील कार्यकारी अभियंता मनाेज सुरडकर, बळीराम केंद्रे, वरिष्ठ भू-वैज्ञानिक डाॅ. भा. ना. संगनवार, भूगाेल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब गोडबोले, कार्यक्रमाधिकारी डाॅ. रत्नाकर बेडगे, डाॅ. शिवप्रसाद डोंगरे, डाॅ. संजय गवई, समन्वयक अधिकारी स्नेहा गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम भूजल सर्वेक्षण विभाग, पुणे येथील संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व सहसंचालक डॉ. पंचमलाल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. डाॅ. सतीश उमरीकर म्हणाले, पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे आपण सर्वांनी संकलन केले पाहिजे, तसेच पुनर्भरण आणि ग्रामस्वच्छता महत्त्वाची आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ. रत्नाकर बेडगे, डाॅ. शिवप्रसाद डोंगरे, प्रा. गुणवंत बिरादार, डॉ. शिवप्रसाद धरणे, डाॅ. संगमेश्वर धाराशीवे, डाॅ. शिवकुमार ईजारे, प्रा. राहुल सोळंके, डाॅ. अभय धाराशिवे, प्रा. राहुल डोंबे, राम पाटील, योगिराज माकणे यांनी परिश्रम घेतले.