तालुक्यातील उंबडगा (खु.) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, नायब तहसीलदार सुभाष कानडे, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सरपंच छाया कोळपे, उपविभागीय अभियंता जयंत जाधव यांची उपस्थिती होती. औसा तालुक्यातील ४१४ किमीच्या शेत व पाणंद रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आ. अभिमन्यू पवार म्हणाले, प्रशासनाने शेतरस्ते मोकळे करून दिल्यास शेतरस्ते तयार करून देण्याची जबाबदारी माझी आहे. मतदारसंघातील शेवटचा शेतरस्ता होईपर्यंत मी आमदार निधी देणार आहे. शेतरस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. या कामात कोणी अडथळा निर्माण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले. कार्यक्रमास दत्तात्रय कोळपे, सुभाष जाधव, संतोष मुक्ता, प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. शिवरुद्र मुर्गे यांनी केले.