येथील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ॲण्ड चॅरिटेबल हॉस्पिटल येथे जागतिक होमिओपॅथी दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील होते. यावेळी प्रा.डाॅ. संतोष कोटलवार उपस्थित होते. यावेळी डॉ. श्रीकांत मध्वरे म्हणाले, आयुषअंतर्गत आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द व होमिओपॅथी या पाच प्रकारच्या उपचार पध्दती जरी वेगळ्या असल्या तरी सर्व चिकित्सा पद्धतीचे प्रयोजन रुग्णास बरे करणे हाच आहे.
डाॅ. संतोष कोटलवार म्हणाले, भारतात प्रचलित झालेल्या होमिओपॅथी चिकित्सा पध्दतीचा प्रत्येक रुग्णास निश्चितपणे लाभ होतो. यावेळी डाॅ. दत्तात्रय पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. मंगेश मुंढे यांनी, सूत्रसंचालन प्रा. डॉ. रश्मी चिद्रे यांनी केले. आभार प्रा. डॉ. दीपिका भद्रे यांनी मानले. कार्यक्रमास आंतरवासियता प्रशिक्षणार्थी व रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.