नीट २०२१ ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन सराव परीक्षा घेताना काेविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे तंताेतंत पालन करण्यात यावे. संबंधित कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करुन घेणे बंधनकारक आहे. यासाठी आवश्यकतेनुसार आराेग्य विभाग, महानगरपालिकेच्या वतीने शिबिराचे आयाेजन करण्यात यावे. बैठक व्यवस्था, शारीरिक अंतर नियमानुसार असावे, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासाठी फेस मास्कचा वापर अनिवार्य असेल, विनामास्क प्रवेश देण्यात येऊ नये, नियमित निर्जंतुकीकरण, वैयक्तिक स्वच्छता, हँडवाॅश, सॅनिटायझरची व्यवस्था, टेंप्रेचर तपासणीकडे लक्ष देण्यात यावे, फक्त नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचीच ऑफलाइन सराव परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात येत आहे. बैठक व्यवस्थेच्या ५० टक्के मर्यादेत जास्तीत जास्त ५० टक्के विद्यार्थी असावेत, काेणत्याही परिस्थितीत वर्ग भरविण्यात येऊ नयेत, एक बॅच संपल्यावर दुसरी बॅच ३० मिनिटानंतर घ्यावी, मध्यान्हानंतर परिसराचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावा, विद्यार्थ्यांना प्रवेश देताना आणि वर्ग संपल्यानंतर गर्दी हाेणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांची संमती घेऊनच वर्गात बसण्याची परवानगी देण्यात यावी. सर्दी, ताप, खाेकला असलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देऊ नये. त्यांची आवश्यक तपासणी करुन उपचार घेण्याबाबत समुपदेशन करण्यात यावे. आदेशातील अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
काेविड नियमांचे पालन करून नीटची ऑफलाइन सराव परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST