अध्यक्षस्थानी व्यंकट पवार होते. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बबन भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील दळवे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस फिरोज देशमुख, इम्तियाज शेख, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, पंचायत समिती सदस्या आस्मा बिरादार, .शहराध्यक्ष अशोक डांगे, धनंजय भ्रमण्णा, प्रशांत देवशेट्टे, अजय शेटकार, रुपेश चक्रे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद भ्रमण्णा, दस्तगीर शेख, व्यंकटराव गोळे, शिंगाडे, माजी प्राचार्य संपत शिंगाडे, श्याम डांगे, गोविंद भोसले, दिगंबर भोसले, नरसिंग डांगे उपस्थित होते.
यावेळी बबन भोसले म्हणाले, शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर अंतर्गत रस्ते, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न महत्त्वाचे असून राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न सोडवून विकास करू. यावेळी व्यंकट पवार म्हणाले, सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आम्ही निवडणुका लढविणार असून शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कार्यकर्त्यांनी एकत्रित व एकदिलाने काम करावे. प्रास्ताविक गोविंद वर्मा, सूत्रसंचालन प्राचार्य संपत शिंगाडे यांनी तर गोविंद भ्रमण्णा यांनी आभार मानले.
निवडणूका आघाडी करुन लढू...
बबन भोसले म्हणाले, आगामी नगरपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाविकास आघाडी करूनच लढवू. काँग्रेसने जर स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा इशारा दिला असेल तर आम्हीही स्वतंत्रपणे लढू असेही त्यांनी सांगितले.