सायकलिंगसाठी आलेले डॉ. मनोहर सूर्यवंशी आणि संदीप देशमुख यांचे स्वागत डॉ. संजय कुलकर्णी व सुनील सावळे यांनी केले. वायुप्रदूषणच नव्हे तर आरोग्य प्रदूषणसुद्धा सायकलमुळे कसे कमी करता येते, याबद्दल विस्तृत मार्गदर्शन डॉ. संजय कुलकर्णी व डॉ. मनोहर सूर्यवंशी यांनी केले. नागरिकांनी सायकलकडे वळावे, आपले व वसुंधरेचे आरोग्य सांभाळावे, असे आवाहनही करण्यात आले. याप्रसंगी डॉ. संजय कुलकर्णी, धनंजय गुडसुरकर, विकास देशमाने, अमोल घुमाडे, सुनील सावळे, डॉ. मनोहर सूर्यवंशी, संदीप मद्दे, करण रेड्डी नागराळकर, युवराज कांडगिरे, सुनील भुयारे, अनिकेत कानमंदे, हरी दांडिमे, ओमकार गांजुरे व पेडल टू गो सदस्य उपस्थित होते.
पेडल-टू- गो ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:57 IST