प्रत्येक वस्ती, रस्ते आणि चौकाची पाहणी करून अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा. फक्त अभिलेख सादर करून चालणार नाही, तर बारकाईने लक्ष देऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनुदान मंजूर झालेल्या, वस्त्या, रस्ते आणि मोहल्ला यांच्या नावांची व्यक्तिश: तपासणी करून कार्यादेश निर्गमित करावेत. तपासणीत अशी नावे आढळून आल्यास त्याअनुषंगाने ठराव करून नाव बदलण्यासाठी संबंधित यंत्रणेला मुदत द्या. तसेच डीपीडीसीच्या वेळेस जातिवाचक नावे बदलून त्या ठिकाणी महापुरुषांच्या नावाने बदल झाल्याची खात्री करून पुढील कार्यवाही करावी, असेही आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.
महापुरुषांची नावे दिली जाणार
जातिवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे गावाला दिली जाणार आहेत. समतानगर, क्रांतीनगर, ज्योतीनगर असेही नामांतर करण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र त्यापूर्वी जातिवाचक नावे असलेल्या गावांची तपासणी करून त्यासंबंधीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.