नागपूर- रत्नागिरी महामार्गासाठी जवळपास १५० शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. जमिनीच्या मावेजापोटी उपजिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी खताच्या आधारे सरासरी २ हजार ९०२ रुपये प्रति चौ. मी. भाव निश्चित केला असता, त्यावर महामार्ग प्राधिकरणने आक्षेप घेतला. त्यामुळे हे प्रकरण लवादाकडे गेले. दरम्यान, लवादाने दोन्ही बाजूच्या पुराव्यांचा अभ्यास न करता केवळ ६७९ रुपये प्रति चौ. मी.प्रमाणे दर निश्चित करून घोर निराशा केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
हा दर आम्हाला मंजूर नाही. त्याचा फेरविचार करून समृद्धी महामार्गाप्रमाणे मावेजा देण्यात यावा, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बुधवारी काम बंद पाडले.
या आंदोलनात शेतकरी प्रा. गोविंदराव शेळके, शाम भगत, बालाजी बोबडे, गोविंद भगत, सरपंच गोपाळ पाटील, बाबुराव भगत, विकास बोबडे, संजय बोबडे, संग्राम भगत, नामदेव सातापुरे, ॲड. सादिक शेख, माऊली बडगिरे, अनिल फुलारी, विजय पाटील, दिनेश भगत, ईस्माईल शेख, महेश पाटील, चैतन्य बोबडे, पंढरी बिलापट्टे, महेश बिलापट्टे, नंदू भगनुरे, मुस्ताक बक्षी, हर्षद बोबडे, गजानन हाडोळे, रमाकांत चेवले, लक्ष्मण चेवले, भानुदास भगत, बाबुराव बिलापट्टे, माऊली बिलापट्टे, धर्मराज चावरे, वसंत डावरे, सुमनबाई शेळके, पार्वतीबाई साळुंके, लक्ष्मीबाई भगत, प्रतिभा बोबडे, चंद्रकला भगत, सुंदरबाई भगत, रंजना भगत, लिंबाबाई भगत, अनुसया भगत आदी सहभागी झाले होते. यावेळी पोनि नानासाहेब लाकाळ, पोउपनि एकनाथ डक, पोहेकॉ. एस. डी. भिसे, पोना. अभिजित लोखंडे, पोहेकॉ. बेल्लाळे, एएसआय आलापुरे आदींनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
सक्षम अधिकारी अनुपस्थित...
या आंदोलनावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा सक्षम अधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक असताना केवळ सेवानिवृत्त कर्मचारी जीवन बोडगे, हरिओम सिंग, रामचंद्र वाकड, बालाजी हिप्परगे हे उपस्थित होते.
महामार्गाचे काम थांबू नये...
लवादाने दिलेल्या निर्णयाला न्याय प्रक्रियेत आव्हान दिले असून, न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम थांबवू नये, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी जीवन देसाई यांनी केले.
सोबत फोटो...
२८एलएचपी एएच१ : मावेजासाठी अहमदपूर येथील शेतकऱ्यांनी नागपूर- रत्नागिरी महामार्गाचे काम बुधवारी बंद पाडत ठिय्या आंदोलन केले.