वलांडी येथील महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्राचे शाखा अभियंता संदीप भराट यांनी वीजबिल वसुलीसंदर्भात ही मोहीम सुरु केली आहे. दरम्यान, गुरुवारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकप्रतिनिधी व ग्राहकांची बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी विष्णू माने, माजी सरपंच राम भंडारे, उपसरपंच प्रा. महेमूद सौदागर, नागेश बनाळे, सूर्यकांत वाघमारे, धनराज बनसोडे, मुस्ताक कादरी, रवी स्वामी, रवी गायकवाड, कर्मचारी बावगे, नितीन वाघमारे, इस्माईल शेख यांची उपस्थिती होती.
यावेळी भराट म्हणाले, घरगुती, व्यावसायिक वीजबिलापोटी ९१ लाख १६ हजार रुपये थकीत आहेत. कृषिपंपाचे २७ कोटी २८ लाख ४३ हजार रुपये थकीत आहेत. घरगुती आणि व्यावसायिक वीजबिल या महिन्यात ३३ लाख वसूल करण्यात आले. कृषिपंपाचे ५ लाख रुपये वसूल झाले आहेत. महावितरण सध्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असून वीज ग्राहकांनी वीजबिलाचा वेळेवर भरणा करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वलांडी येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील स्वतंत्र डीपीची व्यवस्था तत्काळ करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.