महावितरणचे ग्राहक
घरगुती - ३,४६,०६८
व्यापारी - २९,०८१
औद्योगिक - ७,२७०
कृषि - १,२७,९९७
ऑनलाइन भरणा करण्याचे प्रमाण वाढले...
कोरोनामुळे घरी जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद होते. आता सर्व व्यवहार सुरळीत झाले असल्याने वेळेवर रीडिंग घेणे गरजेचे झाले आहे. अनेक ग्राहकांनी ऑनलाइन भरणा करण्यास पसंती दर्शविली आहे.
महावितरणकडून संकेतस्थळ, तसेच ॲपद्वारे बिल भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन भरणा केल्याने वेळेत बचत होत आहे, तसेच वीज भरणा केंद्रावर गर्दी असल्याने घरी बसूनच ऑनलाइन बिल भरणा करण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.
१०० युनिट...
घरगुती वीजग्राहकांना १०० युनिटपर्यंत ३ रुपये ४४ पैसे प्रति युनिटप्रमाणे बिलाची आकारणी केली जाते.
१०१ ते ३०० युनिट...
१०१ ते ३०० पर्यंत प्रतियुनिट ७ रुपये ३४ पैसे प्रति युनिट वीज बिल आकारणी केली जाते.
३०० ते ५०० युनिट...
३०० ते ५०० युनिटसाठी प्रति युनिट १० रुपये ३६ पैशांची आकारणी केली जाते. यासोबतच बिलामध्ये इतर सेवेबद्दलही आकारणी केली जाते. ५०० युनिटच्या पुढे रीडिंग गेल्यास ११ रुपये ८२ पैसे युनिटप्रमाणे वीज बिलाची आकारणी केली जात असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.
वेळेवर बिल...
महावितरणच्या वतीने ग्राहकांना वेळेवर वीज बिलाचे वितरण केले जाते, तसेच वेळेवरच मीटर रीडिंग घेतले जाते. दरम्यान, ग्राहकांनी वेळेवर वीज बिलाचा भरणा केल्यास दंड भरावा लागत नाही. त्यामुळे घरगुती, व्यापारी, व्यावसायिक, तसेच कृषी ग्राहकांनी वेळेवर वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे.
-डी.एन. भोले, महावितरण, लातूर