दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. परंतु, केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शनिवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. लातूर- अंबाजोगाई मार्गावरही आंदोलन झाले. त्यात रेणापूर तालुका काँग्रेस कमिटी, शेतकरी, शेतकरी संघटना, महाराष्ट्र विकास आघाडीने सहभाग नोंदविला. या वेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, संचालक संग्राम माटेकर, प्रवीण पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन माणिक सोमवंशी, पं.स.चे माजी सदस्य दगडू सावंत, ॲड. प्रदीपसिंह गंगणे, माजी संचालक विश्वासराव देशमुख, प्रकाश सूर्यवंशी, सरपंच रामहरी गोरे, उपसरपंच महेश खाडप, गोविंद पाटील, मतिन सय्यद, गजानन देशमुख, नगरसेवक अनिल पवार, भूषण पनुरे, ॲड. शेषेराव हाके, महादेव उबाळे, रामचंद्र शिंदे, दगडू शेख, रोहित गिरी, अजय चक्रे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीचे ॲड. मंचकराव डोणे, बसवंतअप्पा उबाळे, ॲड, अनिरुद्ध येचाळे, नाजम शेख, शरद फुलारी, अनिल गोयकर, कल्याण पाटील, विजय गव्हाणे, दिग्विजय कांबळे आदी सहभागी झाले होते.
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST