लोकनेता संघटनेच्या वतीने आर्थिक मदत
लातूर : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त लोकनेता संघटनेच्या वतीने होतकरू व गरीब पाच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी ॲड. दीपक मठपती, राजकुमार मुंडे, मारुती केंद्रे, ज्ञानोबा केंद्रे, गणेश कराड, इंद्रजित नागरगोजे, मोहन चरक, संतोष मुसळे, विठ्ठल दहिफळे, शैलेश चाटे, शिवराज नागरगोजे आदींसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
भंगेवाडी येथे अभिवादन कार्यक्रम
लातूर : औसा तालुक्यातील भंगेवाडी येथे शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी वसंत कंदगुळे, बालाजी जाधव, करण भोसले, अमोल पाटील, रणधीर धुमाळ, सदाशिव मुस्के, संजय धुमाळ, बाळासाहेब जाधव, मन्मथ मुमाने, शत्रुघ्न कंदगुळे, शिवशंकर जानापुरे, राहुल शंके, जनार्दन कंदगुळे आदींसह गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
माथाडी कामगारांचा बंद
लातूर : महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सोमवारी बंद पुकारण्यात आला. माथाडी कामगारांच्या मागण्या राज्य शासनाच्या विविध विभागांकडे प्रलंबित आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी बंद पुकारण्यात आला आहे.
लातुरात धरणे आंदोलन
लातूर : केंद्र शासनाने शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी सोमवारी महात्मा गांधी चौक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन ॲड. उदय गवारे, ॲड. विजय जाधव, सुधाकर शिंदे, प्रताप भोसले, राजकुमार होळीकर, मोहसीन खान, किरण पवार, ॲड. प्रदीप पाटील, संजय मोरे यांनी केले आहे.
मनपाच्या वतीने शहरात धूरफवारणी
लातूर : शहरात साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शहर महापालिकेच्या वतीने विविध भागांत धूर फवारणी केली जात आहे. मनपाच्या वतीने शहरातील मुख्य रस्ते तसेच प्रभागातील रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे. नियमितपणे कचरा संकलन केला जात आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया व इतर साथ रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी धूर फवारणी केली जात असल्याचे लातूर शहर मनपाच्या वतीने सांगण्यात आले.