शहरं
Join us  
Trending Stories
1
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
2
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
3
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
4
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
5
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
6
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
7
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
8
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
9
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
11
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
12
अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
13
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
14
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
15
Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?
16
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
17
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
18
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
19
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
20
कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका

'खो-खो' खेळात दिसणार अधिक चपळाई; संघात असणार आता १२ ऐवजी १५ खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2022 5:54 PM

'Kho-Kho' sport: आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक खो-खो वाढविण्यासह खेळात होत असलेल्या दुखापतीमुळे अनेक संघावर अन्याय होत होता.

- महेश पाळणे 

लातूर : महाराष्ट्राचा खेळ असलेला खो-खो अधिक वेगवान होणार आहे. भारतीय खो-खो महासंघाने आता संघात १२ ऐवजी १५ अशी खेळाडूंची संख्या केली आहे. त्यामुळे वेगासह या खेळात आता चपळाईही अधिक प्रमाणात दिसणार आहे. या निर्णयाने जिल्ह्याच्या खो-खो क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक खो-खो वाढविण्यासह खेळात होत असलेल्या दुखापतीमुळे अनेक संघावर अन्याय होत होता. त्यामुळे भारतीय खो-खो महासंघाने संघातील खेळाडूंच्या संख्येत वाढ केली असून, आता १२ ऐवजी १५ खेळाडू संघात दिसणार आहेत. यात नऊ खेळाडू मुख्यत: खेळणार असून, उर्वरित सहा खेळाडू राखीव राहणार आहेत. त्यामुळे खो-खो खेळातील राखीव फळीलाही मजबुती मिळाली आहे. बुधवारी महासंघाचे जनरल सेक्रेटरी एम.एच. त्यागी यांनी याबाबत सर्व मान्यताप्राप्त राज्यातील असोसिएशन यांना पत्राद्वारे कळविले आहे. यात सबज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर गटातील पुरुष व महिला संघांचा समावेश असणार आहे. यात १५ खेळाडूंसह एक प्रशिक्षक, एक व्यवस्थापक, एक सपोर्टिंग स्टाफ व एका फिजिओचा समावेश असणार आहे. आगामी काळातील स्पर्धेसाठी हा नियम लागू राहणार आहे. त्यामुळे खो-खो क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

राखीव फळी होणार मजबूत...पोल मारताना किंवा दुसऱ्या संघातील गडी बाद करताना सूर मारल्यानंतर खो-खो खेळात अनेकवेळा खेळाडू जखमी व्हायचे. त्याचा तोटा संघाला होत असे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह तीन खेळाडू पूर्वी राखीव असायचे. आता यात वाढ होऊन ही संख्या सहावर गेली आहे. त्यामुळे लवचिकता, वेग व चपळाई या खेळात अधिक प्रमाणात दिसेल.

खो-खो होणार वेगवान...खेळाडूंची संख्या वाढल्याने संघाला बळ मिळणार आहे. एखादा खेळाडू जखमी झाला तरी त्याला आता पर्याय राहणार असून, या निर्णयाने खो-खो खेळ अधिक वेगवान होईल. - चंद्रकांत लोदगेकर, खो-खो प्रशिक्षक

चांगल्या खेळाडूंना मिळणार संधी...पूर्वी संघात १२ खेळाडू असायचे. संख्याबळ वाढविल्याने अधिकच्या तीन खेळाडूंना संधी मिळणार आहे. अनेकवेळा उत्कृष्ट खेळाडूंना संधी मिळत नव्हती. मात्र खेळाडूंची संख्या संघात वाढल्याने त्यांची सोय झाली आहे. - प्रकाश आयरेकर, राष्ट्रीय खो-खो पटू

टॅग्स :laturलातूरKho-Khoखो-खो