शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

पैशाचा खडखडाट अन् पाण्याचा ठणठणाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:23 IST

गौरी-गणपती व शनिवार, रविवार असल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुट्टया आहेत. सण आणि सुट्ट्यांचा आनंद घेताना पाणीपुरवठ्याच्या आणि पैशाचे विघ्न ...

गौरी-गणपती व शनिवार, रविवार असल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुट्टया आहेत. सण आणि सुट्ट्यांचा आनंद घेताना पाणीपुरवठ्याच्या आणि पैशाचे विघ्न आले. शहरातील एकाही एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. सणाची खरेदी करता आली नाही. तीन दिवसांपासून एटीएममध्ये खडाडाटच आहे. सोमवारीही परिस्थिती ‘जैसे थे’च होती. शहरातील बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, औसा रोड, नांदेड रोड, तसेच अंतर्गत रस्त्यावर असलेल्या अनेक एटीएममध्ये पैसेच नव्हते. अनेकजण एटीएमवर जाऊन पैसे आहेत की नाहीत याची खात्री करून घेत होते. मात्र, पैसे नसल्याने अनेकांना परत जावे लागले. गौरी-गणपतीच्या सणात ही गैरसोय झाल्याने मनस्ताप सहन करावा लागला. बँकेत पैसे असताना ते काढता आले नाहीत. सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित एटीएम यंत्रणेने एटीएममध्ये पैसे आहेत की नाहीत याची खात्री करणे आवश्यक होते, पण ती केली नाही. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय झाली आहे. आपल्या ५०ते ६० एटीएममध्ये सद्य:स्थितीत खडखडाट असल्याचे अनेक ग्राहकांनी सांगितले.

शहरातल्या तीन जलकुंभावरून पाणीपुरवठा....

इकडे लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पावर सबस्टेशनमध्ये बिघाड झालेला होता. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून ठप्प होता. रविवारी रात्री उशिरा दुरुस्ती झाली. मात्र, पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. राजधानी, बसवेश्वर, शासकीय कॉलनी येथील जलकुंभवरून सोमवारी पाणी सोडण्यात आले. उर्वरित भागांमध्ये निर्जळी होती. मांजरा प्रकल्पावरील दुरुस्तीनंतर शहरात सिग्नल कॅम्प, आदर्श कॉलनी, एलआयसी कॉलनी, दीपज्योती नगर, चौधरीनगर आदी भागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला व उर्वरित भागात टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जाणार आहे.

पाण्याचे वेळापत्रक कोलमडले....

मांजरा प्रकल्प सद्य:स्थितीत ९० टक्के भरला आहे. मुबलक पाणीसाठा झाला आहे, पण तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शहरांमध्ये निर्जळी होती. ज्या भागात रविवारी पाणी येणार होते त्या भागात आता मंगळवारी सोडले जाणार आहे. जिथे मंगळवारी पाणीपुरवठा होणार होता तिथे शुक्रवारी पाणीपुरवठा होणार आहे. दोन दिवसांनी वेळापत्रक पुढे गेले आहे. यामुळे शहरवासीयांना मुबलक पाणीसाठा असताना गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे.