शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

लातूर रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल, प्रशासनाच्या सतर्कतेचे घेतले प्रात्यक्षिक, नागरिकांनी अनुभवला थरार

By राजकुमार जोंधळे | Updated: May 11, 2025 01:19 IST

Latur News: भारत व पाकिस्तानदरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी दुपारी रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आले. प्रशासनाच्या सतर्कतेच्या प्रात्यक्षिकाबरोबर नागरिकांना कोणत्याही दहशतवादी हल्ल्यावेळी प्रसंगावधान राखून घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

- राजकुमार जाेंधळे 

लातूर - भारत व पाकिस्तानदरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी दुपारी रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आले. प्रशासनाच्या सतर्कतेच्या प्रात्यक्षिकाबरोबर नागरिकांना कोणत्याही दहशतवादी हल्ल्यावेळी प्रसंगावधान राखून घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, या रंगीत तालमीच्या थराराचा नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवही घेतला.

शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास लातूर रेल्वे स्थानकात दोन दहशतवाद्यांनी प्रवाशांवर गोळीबार केला, अशी माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर काही वेळातच जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा, लातूर महसूल प्रशासन, लोहमार्ग पोलिस, लातूर एटीएस, बीडीएसएस पथक, जिल्हा आरोग्य विभाग, अग्निशमन दलासह इतर विभाग तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि घटनेत जखमी झालेल्यांना तत्काळ उपचारासाठी हलविले.दहशतवाद्यांच्या ताब्यातील बॅगमध्ये स्फोटक पदार्थ असल्याची शक्यता असल्यामुळे बीडीडीएस, आय. कारच्या साह्याने तपासणी करण्यात आली. फॉरेन्सिक लॅबमार्फत घटनास्थळाचे भौतिक दुवे तपासण्यात आले. ट्राफिक अंमलदारांच्या मदतीने रस्त्यावरील गर्दी सुरळीत करण्यात आली. तसेच स्टेशनवरील गोंधळ मेगा फोनद्वारे सूचना देऊन नियंत्रणात आणण्यात आला.

नागरिकांनी गोंधळून जाऊ नये...मॉक ड्रिलच्या अनुषंगाने सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी, सुरक्षिततेच्या कोणकोणत्या योजनांचा अवलंब करावा, गोंधळून न जाता संयमाने परिस्थितीस कसे सामोरे जावे, यासंदर्भात अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले.

दक्षता नागरिकांच्या सुरक्षेची...सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत शांतता, सुव्यवस्थेसाठी सर्वत्र ‘मॉक ड्रिल’ घेण्यात येत आहे. एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जाण्याच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारीचा सराव अशा मोहिमांतून करण्यात येत आहे. तसेच प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे. त्यात काय उणिवा राहिल्या आहेत का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक...नागरिकांनी जागरूक राहून शहराच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काहीही माहिती असल्यास नियंत्रण कक्ष, लातूर फोन क्र. ०२३८२-२४२२९६, डायल ११२ वर संपर्क करून कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात येत आहे. हा मॉक ड्रिल (रंगीत तालीम) पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यात सर्व विभागांचे ४३ अधिकारी, २४० पोलिस अंमलदार व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :laturलातूर