पाेलिसांनी सांगितले, फेब्रुवारीमध्ये राजकुमार दगडू सगर (रा. काेष्टगाव, ता. रेणापूर) यांचा माेबाइल माेटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दाेघांनी हिसकावून त्यांच्याकडील ८०० रुपयेही जबरदस्तीने काढून घेतले हाेते. दरम्यान, याप्रकरणी शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या गुन्ह्यातील आराेपींचा शिवाजीनगर पाेलीस ठाण्याच्या पथकाने शाेध सुुरू केला. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाेलीस पथक आराेपींच्या मागावर हाेते. यातील राहुल शिंदे (२८, रा. वडजी, ता. औसा) आणि अंकुश शंकर सुरवसे (४०, रा. भोयरा, ता. लातूर) या दाेघांना माेठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चाेरीतील माेबाइल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दाेघांनाही दोन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहे. अधिक चाैकशीत माेबाइल हिसकावण्याचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली आहे.