शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात एमआयएमला खिंडार; जिल्हाध्यक्षासह नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 14:28 IST

एमआयएमच्या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लक्ष आगामी नगरपालिका निवडणुकीवर असल्याचा दिसत आहे.

उदगीर ( लातूर ) : लातूर एमआयएमच्या जिल्हाध्यक्षासह उदगीर नगरपालिकेतील एमआयएमच्या ५ नगरसेवकांनी (  MIM's  Corporator's entry into NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेश केला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात आणखी इनकमिंग वाढेल असा राजकीय अंदाज आहे.   

एमआयएमचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन, जरगर शमशोद्दीन, शेख नूरजहाँ बेगम, शेख फय्याज, हाश्मी रेश्मा खतेजा या नगरसेवकांसह एमआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराजजी पाटील नागराळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवकचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, समद शेख, अजीम दायमी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रवादीचे लक्ष नगरपालिकेवर एमआयएमच्या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लक्ष आगामी नगरपालिका निवडणुकीवर असल्याचा दिसत आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नगरपालिकेला एकहाती ताब्यात घेण्याच्या रणनीतीचा हा भाग असल्याचे बोलले जात आहे. ४४ सदस्य संख्या असलेल्या येथील पालिकेवर सध्या भाजपाची सत्ता आहे. पालिकेत भाजपा-२३,काँग्रेस-१४, एमआयएम- ७ तर राष्ट्रवादीचा एकही सदस्य नाही. यामुळे राष्ट्रवादीने येणारी निवडणूक गांभीर्याने घेऊन पक्षात इनकमिंग वाढवली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनlaturलातूर