शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विवस्त्र अवस्थेत आढळलेली मनोरुग्ण महिला गर्भवती! लातूर जिल्ह्यातील तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:38 IST

मनोवस्था बरी नसल्याने रस्त्याने फिरणाऱ्या एकलकोंड्या महिलांची समस्या गंभीर 

लातूर : काही दिवसांपूर्वी मुरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी विवस्त्र अवस्थेत फिरणाऱ्या एका महिलेला पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. दरम्यान, तिथे वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचे उघड झाले आहे. मनोवस्था बरी नसल्याने रस्त्याने फिरणाऱ्या एकलकोंड्या महिलांची समस्या गंभीर असून, गुरुवारी समोर आलेली ही तिसरी घटना आहे.

दिवसभर कोठे तरी दडून बसायचे आणि रात्रीच्या वेळी विवस्त्र अवस्थेत एकट्याने फिरायचे, अशा स्थितीतील एक महिला मुरुड परिसरात आढळून आली होती. तिला एका सुजाण महिलेने कपडे देऊन पोलिसांना कळविले. ही माहिती रिलिजन टू रिस्पाॅन्सिबिलिटी संस्थेचे राहुल पाटील यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मानव सेवा तीर्थ संस्थेचे नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या पुनर्वसन केंद्रात दाखल केले. तिथे महिलेची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ती गर्भवती असल्याचे उघड झाले. तिथे गरोदर महिलेस ठेवण्यासाठी आवश्यक सुविधा नसल्याने पुन्हा लातूर येथे आणून पुणे हिंजवडी येथील राजेश अग्रवाल यांच्या ‘माझं घर फाउंडेशन’ कडे पाठविले जाणार आहे.

महिलांची सुरक्षा कळीचा मुद्दामहिलांची सुरक्षा हा नेहमीच कळीचा मुद्दा बनतो. त्यात मनोवस्था बरी नसलेल्या महिलांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. गेल्या काही महिन्यांमध्ये जगण्याचे भान हरपलेल्या महिला गर्भवती अवस्थेत सापडण्याची ही तिसरी घटना आहे, असे सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला सांगितले.

मुरुड पोलिसांचे संस्थेला पत्रमुरुड पोलिसांनी १ जुलै रोजी पुणे येथील ‘माझं घर फाउंडेशन’ला पत्र पाठविले आहे. त्या महिलेस नाव विचारले असता ती काहीही सांगत नाही. तिच्या नातेवाईकांची माहिती उपलब्ध होत नाही. तिला आधाराची गरज असून, आरटूआर फाउंडेशनचे राहुल पाटील, आकाश गायकवाड, मुस्तफा सय्यद, असिफ पठाण, गोपाळ ओझा यांच्या मार्फत पुण्यातील संस्थेकडे पाठविले जात आहे.

टॅग्स :laturलातूरsexual harassmentलैंगिक छळ