चाकूर येथील संगीता हिचा विवाह २०१९ मध्ये औसा तालुक्यातील वीरपक्षे निलंगेकर यांच्याशी झाला. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी ऑटोमोबाइल्सचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून २ लाख घेऊन ये म्हणून सतत त्रास देऊ लागले. त्यामुळे विवाहितेने ही माहिती माहेरील मंडळींना दिली. त्यांनी सासरच्या मंडळींना विनवणी केली. परंतु, कोणी ऐकले नाही.
संगीता ही दिवाळीला माहेरी आली. तेव्हा पती, सासरा, सासू व अन्य पाच जण चाकुरात आले. त्यांनी विवाहितेला घटस्फोट दे म्हणून शिवीगाळ केली. दरम्यान, महिला तक्रार निवारण केंद्रात समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि सोपान सिरसाट, पोहेकॉ हणमंत आरदवाड करीत आहेत.