शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

मतांचा बाजार मांडला, मतदानाचा हक्क परत घ्या! सत्तानाट्यावर बोटाला चुना लावून आंदोलन

By शिवराज बिचेवार | Updated: July 3, 2023 17:11 IST

सत्तेसाठी वाट्टेल ते करणार्या राजकारण्यांनी तीन मुख्यमंत्री आमच्या माथी मारले. हा सर्व प्रकार लोकशाहीवर दरोडा टाकण्यासारखा आहे.

नांदेड- राज्यात रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला. भाजप आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी महाविकास आघाडी, नंतर शिवसेनेतील बंडखोरी अन् आता राष्ट्रवादीतील फोडाफोडी ही सर्वसामान्य मतदारांची शुद्ध फसवणुक आहे. 

राजकर्त्यांनी आमच्या मतांचा बाजार मांडला असून आमचा मतदानाचा हक्क शासनाने परत घ्यावा या मागणीसाठी तरुणांनी बोटाला चूना लावून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले.निवेदनानुसार, आम्ही प्रत्येक निवडणुकीत उत्साहात मतदान करतो. परंतु २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय मंडळींनी आमच्या मतांची चेष्टा मांडली आहे. आम्ही २०१९ मध्ये एकदा मतदान केले. परंतु सत्तेसाठी वाट्टेल ते करणार्या राजकारण्यांनी तीन मुख्यमंत्री आमच्या माथी मारले. हा सर्व प्रकार लोकशाहीवर दरोडा टाकण्यासारखा आहे. काल महाराष्ट्रात परत एक शपथविधी झाला. हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असून लोकशाहीचा खून करणारा आहे. हे सर्व पाहून लोकशाहीवरील आमचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे लोकशाहीने आम्हाला दिलेला मतांचा अधिकार शासनाने परत घ्यावा अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी महेंद्र देमगुंडे, शंकर स्वामी, अरुण धुतराज, गजानन सरोदे, हनमंत पटणे, माधव स्वामी, प्रकाश केटीग, दिलीप कळसकर, श्रीराम पटाईत यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNandedनांदेड