शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात होतेय अजून पडताळणीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 05:31 IST

लातूर : आठवडाभरापूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस केवळ ५८४ शेतकºयांची यादी देऊन, १ कोटी ९७ लाख २३ हजार रुपये उपलब्ध करून दिले़

लातूर : आठवडाभरापूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस केवळ ५८४ शेतकºयांची यादी देऊन, १ कोटी ९७ लाख २३ हजार रुपये उपलब्ध करून दिले़, परंतु पडताळणी करूनच रक्कम अदा करावी, अशा सूचना दिल्या आहेत़ परिणामी, आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही़औरंगाबाद जिल्ह्यात २२९ शेतकºयांच्या खात्यात ५२,५३,९७४ कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. बीड जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले असले, तरी आतापर्यंत २३६ शेतकºयांचे ९२ लाख कर्जमाफ झाले.आठवडाभरापासून उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया गोठलेलीच आहे़ मागील आठवड्यात शासनाकडून ५८ शेतकºयांची यादी बँकेला देण्यात आली होती़ आतापर्यंत ५८ पैकी ५१ शेतकºयांनाच १८ लाख १ हजार ९८१ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे़मागच्या यादीत थोडासा घोळ झाला होता़ ही बाब शासनास कळविण्यात आली आहे़ त्यानंतर, नव्या फॉरमॅटमध्ये काम करण्याच्या सूचना मिळाल्या़ सतत बदलणाºया नियमांमुळे अधिकारी-कर्मचारी त्रस्त झाले आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली़नांदेड जिल्ह्यात कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांची निश्चित संख्या उपलब्ध नाही. जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार १३३ शेतकºयांचे ३ लाख १२ हजार ७१२ अर्ज अपलोड करण्यात आले आहे. जिल्हा बँकेमार्फत ७१ हजार १८८ शेतकºयांची माहिती पाठविली आहे.जालना जिल्ह्यातील ६ हजार १५५ पात्र शेतकºयांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी बँकांना देण्यात आला आहे. प्रत्यक्षात किती शेतकºयांना पैसे वर्ग करण्यात आले, याची आकडेवारी मिळाली नाही. परभणी जिल्ह्यातील शेतकºयांच्या कर्जमाफीची ४४ कोटी २५ लाख ४९ हजार २८३ रुपयांची रक्कम महाराष्ट्र ग्रामीण बँकेला मिळाली असून, ही रक्कम पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे़>जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ व्हावा, यासाठी जिल्हा बँकेमार्फत शेतकºयांची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. आॅनलाइन अर्जाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. शासनाकडून सर्व शेतकºयांना लवकरच कर्जमाफीची रक्कम मिळेल, अशी अपेक्षा आहे.- आ. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष>शासनाच्या आयटी विभागाच्या निर्देशानुसार, जिल्हा बॅँकेच्या कर्जदार शेतकºयांच्या डाटा अपलोडिंगचे काम पूर्णत्वाकडे आहे. बॅँकेचे १ लाख १६ हजार शेतकरी कर्जदार पात्र ठरले आहेत. आतापर्यंत २३६ शेतकºयांचे ९२ लाख रुपये कर्जमाफ झाले आहे. लवकरात लवकर उर्वरित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.- आदित्य सारडा, अध्यक्ष जिल्हामध्यवर्ती सहकारी बॅँक, बीड

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी