शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्याच्या तडाख्याने पूर्णत्वास आलेले मंगल कार्यालय भुईसपाट

By संदीप शिंदे | Updated: May 23, 2024 19:49 IST

लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील घटना : ७० टक्के उभारणी झाली होती पूर्ण

मुरुड (जि. लातूर) : लातूर जिल्ह्यातील मुरुड परिसरात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात ७० टक्के उभारणी पूर्ण झालेले मंगल कार्यालय भुईसपाट झाले आहे. मात्र, सुदैवाने मंगल कार्यालय कोसळले तेव्हा तिथे मजूर किंवा इतर कोणीही नव्हते. परिणामी, जीवितहानी झाली नाही. परंतू, मंगल कार्यालयावरील सर्वच पत्र्यांचा चोळामोळा झाला असून, ॲन्गल उखडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

मुरुड परिसरातील एमआयडीसी भागात प्रसन्नकुमार लक्ष्मणराव कांबळे यांच्या मंगल कार्यालयाचे बांधकाम चार महिन्यांपासून सुरु आहे. त्यासाठी ७० टक्के काम पुर्ण झाले होते. केवळ भिंतीचे काम बाकी होते. मात्र, गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मुरुड परिसराला चांगलेच झोडपले असून, रस्त्यावरील बोर्डचेही मोठे नुकसान झाले आहे. एमआयडीसी परिसरात मागील चार महिन्यांपासून मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरु होते. चार मजूर मंगल कार्यालय उभारणीचे काम करीत होते. कार्यालय कोसळले त्यावेळी सर्वच मजूर जेवणासाठी घरी गेले होते. मंगल कार्यालयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रसन्नकुमार कांबळे म्हणाले.

रस्त्यावरील होर्डिंग, झाडे पडली...मुरुड परिसरात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लातूररोडवरील होर्डिंग पडले असून, मार्केट रोडसह परिसरात झाडे कोसळली आहेत. अवकाळी पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा काहीवेळ खंडीत झाला होता. दुपारच्या वेळी आलेल्या वादळामुळे बाजारपेठेतही धावपळ उडाली. ग्रामीण भागातून खरेदीसाठी आलेले अनेक ग्राहक वादळी-वारे बंद होताच गावाकडे परतले.

टॅग्स :laturलातूर