महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अप्पाराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन ही निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस विजयकुमार गुत्ते, कार्याध्यक्ष शिवहर स्वामी, जिल्हा संपर्कप्रमुख राजेसाहेब थळकर, जनक पवार यांची उपस्थिती होती. बैठकीत शिक्षक व शिक्षणाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. रेणापूर तालुकाध्यक्षपदी मधुकर माने, सरचिटणीस सुरेश वाघे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मोगरगे यांची निवड करण्यात आली. बैठकीस जनक पवार, यशवंत राठोड, नंदकुमार सारसेकर, एम.एल. सूर्यवंशी, राजेंद्र वाघमारे, अनंतसिंह गहिरवार, सूर्यकांत चाळक, शेषेराव बिरादार, हनुमंत शिंदे, प्रताप भदाडे, अर्जुन चव्हाण, अशोक शिंदे, देवदत्त भारती, सुरनर, हनुमंत गायकवाड, सुरेश मोरे, रमेश शेळके, सुधाकर शिंदे, व्यंकट काकडे, एस. बी. सोनटक्के, राहुल देशमुख, शिवहार स्वामी, राजेसाहेब थाळकर, भीमराव गायकवाड, यशवंत भंडे, श्रीहरी पिंगळे, सिद्धलिंग मुदगडे, बालाजी म्हेत्रे, अंगद सुरवसे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन पांडुरंग पवार यांनी केले. आभार मधुकर माने यांनी मानले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST