शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील १६ गावांतील १०२ पशुधनांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव

By हरी मोकाशे | Updated: September 12, 2022 18:49 IST

लम्पी चर्मरोगाची पशुधनात लक्षणे आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो.

लातूर : जिल्ह्यातील दहापैकी पाच तालुक्यांतील १६ गावांतील १०२ पशुधनास लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात एकही पशुधन दगावले नाही. त्यामुळे पशुपालकांनी घाबरू नये. प्रतिबंधासाठी ५ किमी त्रिजेच्या परिसरातील पशुधनास लसीकरण करण्यात येत आहे. पशुधनास लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रपरिषदेत साेमवारी केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शैलेश केंडे, डॉ. कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले उपस्थित होते. यावेळी सीईओ गोयल म्हणाले, राज्यातील २० जिल्ह्यांत लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. २८ ऑगस्ट रोजी राजस्थानहून आलेल्या एका पशुधनामुळे जिल्ह्यात या रोगाचा संसर्ग झाला असून, गेल्या दोन-तीन दिवसांत बाधित जनावरांची संख्या वाढली आहे. हा रोग म्हशींमध्ये क्वचित प्रमाणात असून, गाय आणि बैलांमध्ये प्रामुख्याने आहे. त्यामुळे ३४ हजार ९८३ गोवंशांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १३ हजार २२२ लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या तीन बैल वगळता लागण झालेले इतर पशुधन बरे झाले आहेत.

बाहेरून औषधी मागविणाऱ्यांवर कारवाई...रोगाच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून एक लाख लस पुरवठा करण्यात येणार आहे. शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत मोफत उपचार आणि लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पशुपालकांनी औषधींची बाहेरून खरेदी करू नये. तरीही जर पशुवैद्यकीय दवाखान्यात बाहेरून औषधी आणण्यास सांगितल्यास, त्याची माहिती द्यावी. औषधी आणण्यास सांगणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे सीईओ गोयल यांनी सांगितले.

सध्या पशुधन खरेदी करणे टाळावे...

लम्पी चर्मरोगाची पशुधनात लक्षणे आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो. सध्या जनावरांचे बाजार, शर्यती, प्रदर्शने, वाहतुकीवर बंदी आहे. अशा परिस्थितीत पशुधन खरेदी करू नये. तसेच ग्रामपंचायतीमार्फत ११६७ गोठ्यांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे. तसेच शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे, असे सीईओ गोयल यांनी सांगितले.

रोग नियंत्रणासाठी घ्या दक्षता...

लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी गोठा व परिसर स्वच्छ, हवेशीर ठेवावा. परिसरात पाणी साठू देऊ नये. गोठ्यात व जनावरांवर कीटकनाशक औषधींची फवारणी करावी. नेहमी दूध उकळून प्यावे. जनावरांची वाहतूक करू नये.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी