शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लम्पीमुळे पशुपालक धास्तावले; १० महिन्यांच्या गोऱ्ह्याचा मृत्यू, गायीलाही झाली लागण

By आशपाक पठाण | Updated: July 8, 2023 17:49 IST

वर्षभरापूर्वी जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव अनेक पशुधनांत आढळून आल्याने पशुपालकांची तारांबळ उडाली होती.

लातूर : पशुधनाच्या अंगावर लालसर फोड, ताप येणे, चारा न खाणे असे प्रकार लातूर तालुक्यातील टाकळगाव येथे पशुधनात आढळून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका दहा महिन्यांच्या गोऱ्ह्याचा लम्पी स्कीन या आजारामुळे मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी गावातीलच आणखी एका दीडवर्षाच्या गायीला लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता गावातील पशुपालक धास्तावले आहेत. 

वर्षभरापूर्वी जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव अनेक पशुधनांत आढळून आल्याने पशुपालकांची तारांबळ उडाली होती. काही महिन्यांपूर्वी सर्व काही सुरळीत असताना अचानक लातूर तालुक्यातील मांजरा पट्टा म्हणून ओळख असलेल्या टाकळगाव शिवारात दोन पशुधनाला लम्पीची लागण झाली आहे. टाकळगाव येथील मुकेश बाबूराव शिंदे यांच्या दहा महिन्यांच्या गोऱ्ह्याचे गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. तत्पूर्वी पाच दिवसांपूर्वी त्याला लम्पीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तांदुळजा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारही सुरू केले होते. उपचार सुरू असतानाच त्या गोऱ्ह्याचा मृत्यू झाल्याचे शेतकरी शिंदे यांनी सांगितले. पाच दिवसांपासून उपचार सुरू होते, त्यात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप मुकेश शिंदे यांनी केला आहे.

शेतकरी धनंजय रामलिंग शिंदे यांच्या दीड वर्षाच्या गायीलाही लम्पीची लागण झाली असून अंगावर लालसर फोड आले आहेत. शिवाय, ताप येणे, गाय चाराही खात नसल्याने धनंजय शिंदे यांनी सांगितले. माझ्याकडे इतरही पशुधन आहे, त्यामुळे भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

मी राजीनामा दिला, मला माहिती नाही...यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी तांदुळजा येथील पशुवैद्यकीय अधिकारी संतोष पाटोळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मुकेश शिंदे यांच्या पशुधनाला लम्पीची लागण झाली होती. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पाटोळे म्हणाले, आता किती पशुधनाला लागण झाली मला माहिती नाही. मी आता राजीनामा दिला आहे. यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजकुमार पडिले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

गावातील पशुधनाची तपासणी करा...लम्पी स्कीनच्या भीतीने टाकळगाव परिसरातील गावातील शेतकरी धास्तावले आहेत. टाकळगावात असलेल्या पशुधनाची तपासणी करून लसीकरण करण्यात यावे. लम्पीचा फैलाव हाेणार नाही, यासाठी पशुवैद्यकीय विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी माजी उपसरपंच विनोद कदम, अमोल कदम, धनंजय शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी