शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

लोकमत इफेक्ट : खेळाडूंना मिळणार आता तंत्रशुद्ध मार्गदर्शन; राज्यातील क्रीडा मार्गदर्शकांच्या भरतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:51 IST

चार महिन्यांपूर्वी शासनाने क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्ती संदर्भात परिपत्रक काढले होते. मात्र त्यानंतर सर्व थंडच होते. याची दखल घेत ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला.

ठळक मुद्देमार्गदर्शक गेल्या अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.प्रत्येक जिल्ह्याला मिळणार किमान तीन मार्गदर्शक...

- महेश पाळणे 

लातूर : खेळाडू घडविण्याचे मुख्य स्त्रोत असलेले मार्गदर्शक गेल्या अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेते खेळाडू घडविण्याचा शासनाचा उद्देश असला तरी क्रीडा मार्गदर्शकांअभावी त्याला हरताळ फासली जात होती. चार महिन्यांपूर्वी शासनाने क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्ती संदर्भात परिपत्रक काढले होते. मात्र त्यानंतर सर्व थंडच होते. याची दखल घेत ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला. परिणामी, मंगळवारी क्रीडा आयुक्तांनी भरती संदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

क्रीडा मार्गदर्शकांअभावी प्रशिक्षण केंद्रातील मैदाने रिकामी

आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील खेळाडूंनी पदके पटकावीत ही अपेक्षा घेऊन राज्यातील सर्वच जिल्ह्यांत क्रीडा मार्गदर्शकांची पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कालांतराने यात सातत्य राहिले नाही. चार वेळा क्रीडा मार्गदर्शकांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यामुळे राज्यातील प्रशिक्षण केंद्रे ओसाड पडली होती. आॅगस्ट २०१९ मध्ये शासनाने पुन्हा ही पदे भरण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापुढे कोणतीच कारवाई झाली नाही. याची दखल घेत ‘लोकमत’ने ‘क्रीडा मार्गदर्शकांअभावी प्रशिक्षण केंद्रे पडली ओस’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत राज्याच्या क्रीडा विभागाने १७ डिसेंबर रोजी पत्रक काढून राज्यातील सर्व क्रीडा उपसंचालकांना क्रीडा मार्गदर्शकाच्या भरती संदर्भात तात्काळ कारवाई करावी, अशा मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे क्रीडा मार्गदर्शकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी, राज्यातील सर्वच जिल्ह्यांत खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार आहे.

प्रत्येक जिल्ह्याला मिळणार किमान तीन मार्गदर्शक...राज्यभरात एकूण ११० क्रीडा मार्गदर्शकांची पदे भरली जाणार असून, प्रत्येक जिल्ह्याला किमान तीन क्रीडा मार्गदर्शक मिळणार आहेत. जिल्ह्यातील प्रचलित खेळ व गरज असलेल्या खेळाला मार्गदर्शक मिळणार आहे. त्यामुळे खेळाडूंना प्रशिक्षित मार्गदर्शकाकडून योग्य प्रशिक्षण मिळणार आहे.

एनआयएस कोचेसला आधार...भारतात पटियाला, बंगळुरु, कोलकाता येथे एक वर्षाचा प्रशिक्षणाचा कोर्स केलेले एनआयएस क्रीडा मार्गदर्शक राज्यभरात अनेक आहेत. त्यांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र शासनाकडून क्रीडा मार्गदर्शकांची भरती नसल्याने क्रीडा प्रगती खुंटली होती. एनआयएस प्रशिक्षक हा प्रशिक्षण देण्यासाठी परिपूर्ण असतो. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात यांना महत्त्व आहे. शासनाच्या या नवीन भरतीमुळे राज्यातील एनआयएस क्रीडा मार्गदर्शकांना एकप्रकारे आधार मिळणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रlaturलातूरState Governmentराज्य सरकार