शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : लातुरात तिघांचे पाच उमेदवारी अर्ज अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 15:57 IST

१२ उमेदवारांचे २२ अर्ज ठरले वैध

लातूर : लातूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी दाखल झालेल्या अर्जांची बुधवारी सकाळी छाननी करण्यात आली़. यात २७ अर्जांपैकी ५ अर्ज अवैध ठरले आहेत़.

लातूर लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या १५ जणांनी मंगळवारपर्यंत २७ अर्ज दाखल केले होते़. या अर्जांची बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात छाननी करण्यात आली़ त्यात संजय दोरवे,विकास कांबळे, भगवान कुमठेकर  या  उमेदवारांचे ५ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत़. याशिवाय अपक्ष असलेले मधुकर कांबळे यांचा दोनपैकी एक अर्ज बाद झाला आहे. अन्य प्रमुख उमेदवारांसह १२  उमेदवारांचे २२ अर्ज वैध ठरले आहेत़.

यात प्रामुख्याने काँग्रेस  महाआघाडीचे उमेदवार मच्छिंद्र कामंत, भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे, वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर, बसपाचे सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्यासह अपक्ष उमेदवारांच्या अर्जाचा समावेश आहे़. २९ मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे़ या कालावधीत कोण-कोण माघार घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़  

यामुळे ठरले अर्ज अवैध़़अर्ज अवैध ठरलेल्या तीनपैकी एका  उमेदवारांनी आपले प्रतिज्ञापत्र अपूर्ण व आवश्यक माहिती न भरल्यामुळे अवैध ठरले. तर संजय दोरवे यांनी भाजपाकडून  अर्ज दाखल केला होता, विकास कांबळे यांनी वंचित आघाडीकडून अर्ज भरला होता. या दोघांच्या अर्जासोबत ए बी फॉर्म  नसल्याने अर्ज अवैध ठरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlaturलातूरElectionनिवडणूक