शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाऱ्याच्या दिशेनुसार फिरते टोळधाड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 19:27 IST

या किडीचे थवे महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती जिल्ह्यात दिसून येत आहेत. हे थवे ताशी १२ ते १६ किमी वेगाने उडतात. 

ठळक मुद्दे ही कीड अत्यंत चपळ व खादाड असून नाकतोडा गटातील आहे. मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, फुले, फळे, बिया आदीचा फडशा पाडते.

लातूर : मध्यप्रदेशातून विदर्भातील काही जिल्ह्यात टोळधाड दाखल झाली आहे. ती वाऱ्याच्या दिशेनुसार आपली दिशा बदलत असते. जिल्ह्यात येण्याची शक्यता कमी आहे. तरीही दक्षता म्हणून कृषी विभागाने त्यावर लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी बुधवारी दिली. सध्या गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेशात टोळधाडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

या किडीचे थवे महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती जिल्ह्यात दिसून येत आहेत. हे थवे ताशी १२ ते १६ किमी वेगाने उडतात. ही टोळी कीड समूहाने उडते व आपल्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, फुले, फळे, बिया आदीचा फडशा पाडते. ही कीड अत्यंत चपळ व खादाड असून नाकतोडा गटातील आहे. एका दिवसात ही टोळ त्याच्या वजनाएवढे अन्न खाते, असे जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. 

रात्रीच्या वेळी झाडावर जमा होते टोळ...  रात्रीच्या वेळी ही टोळी झाडा-झुडपावर जमा होते. त्याचे नियंत्रण करण्यासाठी कृषी आणि शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या प्रयत्न करावे लागतात. कृषी विद्यापीठाकडून यासंदर्भात माहिती येत आहे. सध्याच्या परिस्थितीत ही टोळ लातूर जिल्ह्यात येण्याची शक्यता कमी आहे. तरीही खबरदारी म्हणून आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले. 

बंदोबस्तासाठी नियोजन करावे...  देशातील अनेक राज्यात या टोळधाडीने धुमाकूळ घातलेला आहे. महाराष्ट्रात ही प्रवेश केला आहे. ज्या ठिकाणी ही टोळधाड जाईल, तिथे काही शिल्लक राहत नाही. सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळी भुईमूग, काकडी, टरबूज यासह फळे-भाजीपाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने टोळधाडीच्या बंदोबस्तासाठी नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीlaturलातूर