दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता मूल्यमापन विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ''वाचनाने समृद्ध होते मत, मिळे जीवनास गती'' या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके होते.
डॉ. कुंभार म्हणाले, अभिजात ग्रंथ शाश्वत मूल्यांची जाणीव करून देत असतात. ते आपल्या जीवनात काय टाळावे आणि काय टाळू नये. तसेच विकारावर नियंत्रण व मात करण्यासाठी ते मार्गदर्शक ठरतात. आज आपल्या देशात जी आव्हाने आहेत त्यामध्ये नैतिक मूल्याचे अधपतन महत्त्वाचे असून यावर मात करण्यासाठी, नवीन दृष्टी प्राप्त करण्यासाठी अभिजात ग्रंथ वाचले पाहिजेत. ग्रंथालयाकडे आपण व्यवसाय म्हणून न पाहता ही एक माणूस आणि समाज सुसंस्कृत करण्याची प्रक्रिया आहे, चळवळ आहे आणि ही चळवळ सतत चालू राहिली पाहिजे. यासाठी "कुटुंब तिथे ग्रंथालय" ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली पाहिजे. दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील ग्रंथालयात अनेक प्रेरक उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा.विठ्ठल जाधव तर प्रमुख पाहुण्याची ओळख आय.क्यू.ए.सी. प्रमुख डॉ.बालाजी कांबळे यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. सौ. मनीषा आष्टेकर तर आभार डॉ. साईनाथ उमाटे यांनी मानले. या राज्यस्तरीय वेबिनारसाठी टेक्निकल सपोर्ट बी.सी.ए. विभाग प्रमुख प्रा.शशिकांत स्वामी, प्रा. लहू शेंडगे, प्रा.अरुणा चौधरी, प्रा. प्रसाद पाटील, प्रा. दीपक सूर्यवंशी, प्रा. प्रेमसागर मुंदडा यांनी केले.