शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

शिवणी, शिवणखेडमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांत भीती : सतर्कतेचे आवाहन

By हरी मोकाशे | Updated: May 16, 2024 20:26 IST

याबाबतचे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक वैशाली तांबे यांनी केले आहे.

लातूर : चाकूर तालुक्यातील शिवणी, शिवणखेडमध्ये ऊसाचे फड आणि पाणी असल्याने बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तरीही ग्रामस्थांनी सतर्क रहावे, असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक वैशाली तांबे यांनी केले आहे.

चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथे गत आठवड्यात म्हशीच्या वासराचा कुठल्या तरी वन्य प्राण्याने फडशा पाडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागास माहिती दिली. त्याच दिवशी रात्री वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा कुठल्याही वन्य प्राण्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या नाहीत. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पुन्हा काही शेतकऱ्यांनी बिबट्या दिसल्याची माहिती दिली. त्यावरुन वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथील परिसराची पाहणी केली असता बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत.

चार तालुक्यातील कर्मचाऱ्यांची गस्त...चाकूर तालुक्यातील शिवणी व शिवणखेड परिसरात ऊसाचे मोठे फड आहेत. त्याचबरोबर पाण्याची सुविधा आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर झाल्याचे पाऊलखुणावरुन दिसून येत आहे. बिबट्यास जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच पाच ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर चाकूर, अहमदपूर, जळकोट, उदगीर तालुक्यातील वनरक्षक व वनपालांकडून सातत्याने गस्त सुरु आहे. नागरिकांनी सतर्क रहावे म्हणून दवंडी देण्यात आली आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी शेतात मुक्काम करु नये...शेतकऱ्यांनी शेतात रात्री मुक्काम करू नये. साथ सलोख्याचे नियम पाळून, चमूने, गटाने शेती कामासाठी जावे. शेतात मोकळ्या जागेत मुक्काम करू नये. लहान मुलांना एकट्याने फिरू देऊ नये. जनावरांना बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यात बांधावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. बिबट्या निदर्शनास आल्यास त्याची माहिती वन विभाग, सरपंच, पोलिस पाटीलांना कळवावी.- वैशाली तांबे, सहायक वनसंरक्षक.

टॅग्स :laturलातूर