शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बाभळगावात पालकमंत्र्यांच्या शेताजवळ आढळले बिबट्याच्या पावलांचे ठसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:34 IST

बाभळगाव नजीकच्या मुख्य रस्त्यावर काही जणांना बिबट्याचे दर्शन घडले

ठळक मुद्देबाभळगावातील नागरिकांत भीतीवनविभागाने लावले तीन पिंजरे

लातूर : लातूर शहराजवळ बाभळगाव येथे रविवारी सकाळी ६.३० च्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शेतीजवळ बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तीन पिंजरे लावले आहेत.

लातूर-बाभळगाव-भुसनी-निटूर या मार्गावर नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी शेतकऱ्यांची रेलचेल सुरू होती. दरम्यान बाभळगाव नजीकच्या मुख्य रस्त्यावर काही जणांना बिबट्याचे दर्शन घडले. त्यामुळे भीतीपोटी हे नागरिक घराकडे परतले. त्याचवेळी या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. ही माहिती पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर दोन्ही विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शेतातील शेतगड्याने बिबट्या आढळल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अर्ध्या तासाच्या कालावधीत तालुका वन परिमंडळ अधिकारी एन.एस. पचरंडे यांच्यासह २० कर्मचारी दाखल झाले. त्यांनी बिबट्यांच्या माग काढण्यास सुरुवात केली असता, पालकमंत्र्यांच्या ऊस शेतीजवळ एका बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ऊस शेती परिसरात दोन ठिकाणी पिंजरे लावले आहेत. याशिवाय काही अंतरावर असलेल्या बांबूशेती परिसरातही एक पिंजरा लावला आहे. 

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसिलदार स्वप्नील पवार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी भेट देऊन माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

नागरिकांनी घाबरू नये... एका बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आम्ही तीन पिंजरे लावले आहेत. तसेच २० कर्मचारी आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. असे तालुका वन परिमंडळ अधिकारी एन.एस. पचरंडे यांनी सांगितले.

६० एकर परिसरात फिरू नका... बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हे ठसे ऊस शेती परिसरातील आहेत. त्यामुळे नागरिकांनी या भागातील ५० ते ६० एकर परिसरात फिरू नये , असे आवाहनही पचरंडे यांनी केले आहे. 

दोन वर्षांपूर्वी आढळला होता बिबट्या... लातूर जिल्ह्यात बिबट्याचे वास्तव्य नाही. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरातून पाणी आणि खाद्याच्या शोधात बिबटे येतात. पावसाळा सुरू होऊ लागला की पुन्हा हे बिबटे डोंगराळ भागाकडे परततात. दोन वर्षांपूर्वी रेणापूर तालुक्यातील खलंग्री परिसरात बिबट्या आढळला होता. 

त्रणभक्षी प्राणी हे खाद्य... बिबट्याचे खाद्य हे त्रणभक्षी प्राणी आहेत. लातूर जिल्ह्यात माळराने अधिक असल्याने हरीण, लांडगा, कोल्हा, रानडुक्कर अशा त्रणभक्षी प्राण्यांचे प्रमाण अधिक आहे. बिबट्याचे त्रणभक्षी प्राण्यांवर लक्ष असते. हे प्राणी न मिळाल्यास पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात, असे तालुका वन परिमंडळ अधिकारी एन.एस. पचरंडे यांनी सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याlaturलातूरAmit Deshmukhअमित देशमुखFarmerशेतकरी