शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या विद्यार्थ्यांची इस्रो सहल, हवाई सफरीसाठी गुरुजींचीही आता लेखी परीक्षा

By हरी मोकाशे | Updated: March 18, 2023 17:36 IST

इस्रो भेटीसाठी ३० शाळांतील इच्छुक शिक्षकांची शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

लातूर : बंगळुरूतील भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि परिसरातील विविध वैज्ञानिक स्थळपाहणी, अभ्यास आणि हवाई सफरीसाठी जिल्ह्यातील इच्छुक शिक्षकांची संख्या वाढली आहे. परिणामी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापुढे पेच निर्माण झाला होता. त्यावर मार्ग काढत शिक्षण विभागाने इच्छुक शिक्षकांसाठी सोमवारी लेखी परीक्षेची कसोटी लावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपाठोपाठ गुरुजींनाही आता परीक्षा द्यावी लागणार आहे.

जिल्हा परिषदेच्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांतील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा म्हणून विभागीय आयुक्तांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बंगळुरू तसेच परिसरातील विविध वैज्ञानिक संस्थांना भेटी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ३२ हजार ९४० विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा झाली. गुणवत्तेनुसार त्यांतील ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, या विद्यार्थ्यांसोबत विज्ञानाचे ५ शिक्षक असणार आहेत. या सफरीमध्ये आपली वर्णी लागावी म्हणून या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे शिक्षण विभागापुढे मोठी समस्या निर्माण झाली. अखेर या शिक्षकांची बैठक घेण्यात येऊन लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी या शिक्षकांनी होकार दर्शविला.

शंभर गुणांची होणार परीक्षाइस्रो भेटीसाठी ३० शाळांतील इच्छुक शिक्षकांची शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात ७५ गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील; तर २५ गुणांचा एक निबंध असेल. हा निबंध विज्ञान विषयाशी निगडित राहणार आहे. एकूण शंभर गुणांची परीक्षा होणार आहे.

उत्तर चुकल्यास वजा हाेणार गुणदोन तासांची ही परीक्षा सोमवारी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत लातुरातील केंद्रावर होणार आहे. लेखी परीक्षेत उत्तर चुकल्यास गुण वजा केले जाणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गुणांवर होणार निवडइस्रो भेटीसाठी इच्छुक शिक्षकांची संख्या वाढली. त्यामुळे निवड कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला; कारण, आम्ही निवडलेल्या शिक्षकांवर आक्षेप येऊन वाद होऊ नयेत म्हणून अखेर लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शिक्षकांची सहलीसाठी निवड केली जाणार आहे.- वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

आमचाही वैज्ञानिक दृष्टिकोन वाढेलसहजासहजी इस्रोला जाऊन तेथील पाहणी करता येत नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या पाहणीतून आमचाही वैज्ञानिक दृष्टिकोन आणखी वाढेल आणि त्याचा शाळेत अध्यापन करताना आणखी लाभ होईल.- परीक्षार्थी शिक्षक

टॅग्स :laturलातूरEducationशिक्षण