शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'लातूर पॅटर्न'चा दबदबा कायम; राज्यात १०० टक्के गुण घेणारे ७० विद्यार्थी लातूर विभागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 15:54 IST

लातूर विभागीय मंडळाचा ९७.२७ टक्के निकाल

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला असून, लातूर विभागाचा ९७.२७ टक्के निकाल लागला आहे. १०० पैकी १०० गुण मिळविणाऱ्या राज्यातील १२२ विद्यार्थ्यांमध्ये लातूर विभागातील ७० विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर लातूर बोर्ड राज्यात तिसऱ्या स्थानावर आहे. एकंदर, दहावीच्या निकालात लातूरचा दबदबा कायम आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी लातूर मंडळातून एकूण १ लाख ७ हजार ९५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ५ हजार ८९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, यातील १ लाख ३ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे. लातूर विभागात नांदेड जिल्ह्याचा ९६.६८, उस्मानाबाद जिल्ह्याचा ९७.८४ आणि लातूर जिल्ह्याचा ९७.६३ टक्के निकाल लागला आहे, तर विभागाचा ९७.२७ टक्के निकाल लागला आहे.

५६ हजार १२२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यातलातूर विभागातील एकूण परीक्षार्थ्यांपैकी ५६ हजार १२२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व परीक्षार्थ्यांना ७५ टक्क्यांच्यावर गुण मिळाले आहेत. ३२ हजार २८९ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांच्या वर गुण घेतले आहेत. १२ हजार ६४२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, १९५० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत. एकूण १ लाख ३ हजार ३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत यशस्वी झाले असल्याचे लातूर बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष तथा सचिव सुधाकर तेलंग यांनी सांगितले.

लातूर बोर्डात मुलींचीच बाजीलातूर विभागात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. एकूण ४८ हजार ४६७ मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. त्यापैकी ४७ हजार ५९६ मुली या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. ९८.२० टक्के मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण आहे, तर ५७ हजार ४२३ मुले दहावीच्या परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी ५५ हजार ४०७ मुले पास झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.४८ टक्के आहे. १.७२ टक्के मुली मुलांपेक्षा पुढे आहेत.

टॅग्स :laturलातूरSSC Resultदहावीचा निकाल