शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वरीने लंडनमध्ये केली कमाल! राष्ट्रकुलमध्ये तलवारबाजी सांघिक गटात पटकावले राैप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 18:15 IST

''भविष्यात कामगिरीत आणखीन सुधारणा करून ऑलिम्पिक खेळण्याचे ध्येय आहे.''

- महेश पाळणे लातूर : आक्रमक खेळ व उत्कृष्ट पॅरी अटॅकचे काैशल्य असलेल्या लातूरच्या ज्ञानेश्वरी शिंदेनी लंडन येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत ज्युनिअर गटात आपल्या खेळाची लय कायम राखत भारताला सांघिक गटात राैप्यपदक मिळवून दिले.

हालाखीच्या परिस्थितीवर मात करत ज्ञानेश्वरी माधव शिंदेने इप्पी प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत लंडन येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत छाप साेडली आहे. तिची सलग ही तिसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून, या स्पर्धेत तिने आपले काैशल्य पणाला लावून भारताला हे यश मिळवून दिले आहे. लीग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत संघाने अनेक देशांचा पराभव केला. पहिल्या आठ देशांच्या झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४५-४० असा पराभव केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ५ गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात मात्र यजमान इंग्लंड संघाकडून भारताला ४५-२५ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे राैप्यपदकावरच समाधान मानावे लागले. तिला प्रशिक्षक वजिराेद्दीन काझी, माेहसीन शेख, आकाश बनसाेडे, बबलू पठाण, राेहित गलाले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे राज्य संघटनेचे अध्यक्ष सतीश बंटी पाटील, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डाॅ. अभिजित माेरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दत्ता गलाले, क्रीडा संचालक सुधीर माेरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी काैतुक केले.

क्रीडाक्षेत्राने दिला मदतीचा हात...राष्ट्रकुल स्पर्धेत केंद्राच्या क्रीडा विभागाने केवळ पाच खेळाडूंचा खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली हाेती. यामुळे ज्ञानेश्वरीचे राष्ट्रकुल स्पर्धेचे स्वप्न भंगते की काय, असे वाटत हाेते. मात्र, लातूरच्या क्रीडा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एक लाखाचा निधी तिला उपलब्ध करून दिला. यासह जिल्हा संघटनेनेही तिला ६१ हजारांची मदत केली. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानेही तिला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तिचा मार्ग सुकर झाला हाेता. त्यातच तिने आता पदक जिंकल्याने ही मदत सार्थ ठरली.

ऑलिम्पिक खेळण्याचे ध्येय...राष्ट्रकुल स्पर्धेत राैप्यपदक जिंकल्याचा आनंद आहे. भविष्यात कामगिरीत आणखीन सुधारणा करून ऑलिम्पिक खेळण्याचे ध्येय आहे. - ज्ञानेश्वरी शिंदे, लातूर

टॅग्स :laturलातूरCommonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा