शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मोहालीत लातूरच्या आकाशची ‘सुवर्ण’झेप; अखिल भारतीय स्पर्धेत दुसऱ्यांदा चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 19:00 IST

मोहाली येथील चंडीगड विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत आकाशने ही सुवर्णकिमया साधली आहे.

- महेश पाळणेलातूर : तगड्या स्नॅच व क्लिन अँड जर्कच्या जोरावर लातूरच्या आकाश श्रीनिवास गौंडने मोहालीत सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत २४० किलो वजन उचलत सुवर्णझेप मारली आहे. आकाशने सलग दुसऱ्या वर्षी अखिल भारतीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून लातूरचे नाव भारताच्या नकाशावर कोरले आहे.

मोहाली येथील चंडीगड विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत आकाशने ही सुवर्णकिमया साधली आहे. १३२ किलो क्लीन अँड जर्क व १०८ किलो स्नॅच मारत आकाशने तब्बल २४० किलो वजन उचलत भारतातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. दयानंद कला महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आकाशची घरची परिस्थिती बेताची; मात्र याला छेद देत त्याने अनेक वेळा लातूरला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. क्रीडा विभागानेही याची दखल घेत, त्याला काही दिवसांपूर्वीच खुराकासाठी एक लाखाची मदत केली होती. मोहालीच्या गुलाबी थंडीत सुवर्णपदकावर निशाणा साधत त्याने गोल्डन कामगिरी केली आहे.

सलग दोनवेळा सुवर्णयोग...गतवर्षी आकाशने २३५ किलो वजन उचलत याच स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. यंदाच्या वर्षातही त्याने ४० स्पर्धकांत प्रथम येऊन दुसऱ्यांदा हा बहुमान पटकाविला आहे. स्पर्धेत त्याने एकतर्फी वर्चस्व गाजविले असून, सिल्व्हर व ब्राँझपदक विजेता वेटलिफ्टर त्याच्यापेक्षा १५ ते १६ किलोने मागे आहे. त्याला प्रशिक्षक नीलेश जाधव, प्रा. अशोक वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.

वेस्ट झोनचा बेस्ट लिफ्टर...नुकत्याच आंध्र प्रदेश येथे झालेल्या साउथ वेस्ट आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्याला बेस्ट लिफ्टरचे अवॉर्ड मिळाले होते; तसेच अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले होते. यांसह अनेक स्पर्धांमध्ये त्याने पदकांची लयलूट केली आहे.

कामगिरीचा वाढता आलेख...केवळ स्पर्धेत पदके पटकाविणेच आकाशचे लक्ष्य नसून, कामगिरीत सुधारणा करण्याचाही तो सातत्याने प्रयत्न करीत आहे. गतवर्षी झालेल्या अखिल भारतीय स्पर्धेत त्याने एकूण २३५ किलो वजन पेलले होते. यात पाच किलोंनी सुधारणा होऊन त्याने यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदकासह २४० किलो वजन उचलत कामगिरीचा आलेख उंचावला आहे.

नॅशनल गेमची तयारी...दुसऱ्यांदा अखिल भारतीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याचा आनंद आहे. मात्र याहूनही उत्तम कामगिरी मला करावयाची आहे. सप्टेंबर महिन्यात उत्तराखंड येथे होणाऱ्या नॅशनल गेमची तयारी करणार असून, यातही सुवर्णपदक पटकाविण्याचे लक्ष्य असून, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागासाठीही प्रयत्न करणार असल्याचे आकाशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :laturलातूर