कोरोना काळात हौसेला मोल नाही...
कोरोना काळातही अनेकांनी पसंती क्रमांकाला पसंती दिली. दुचाकी असो की चारचाकी अनेकजण चॉईस नंबरसाठी विचारणा करतात. आपापल्या हौसेनुसार शुल्क भरून नंबर घ्यायची क्रेझ आता दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद शहरांच्या तुलनेत लातूरमध्ये जास्त किंमतीच्या क्रमांकाला अद्याप मागणी नाही. सर्वाधिक दीड लाखापर्यंतचे क्रमांक गेले आहेत. तीन वर्षानंतर चारचाकी नंबरची सिरीज २४ जून रोजी संपली असून आता सिरीजमध्ये पसंतीक्रमांसाठी वाहनधारकांची उडी पडली आहे.
........................
लातूर जिल्ह्यात पसंतीक्रमांकाला मागणी वाढत आहे. मागील तीन वर्षात जवळपास ३ कोटींचा महसूल शासनाला मिळाला आहे. १ नंबरसाठी ३ लाख रुपयांचे शुल्क असल्याने अद्याप कोणी घेतला नाही. परंतु १५ हजार ते दीड लाख शुल्कापर्यंतच्या नंबरला मागणी चांगली आहे................... नंबरचीही क्रेझ वाढत आहे.
.................. अमर पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर
यानंबरला सर्वाधिक मागणी
९९९९- दीड लाख
९९९ दीड लाख
५,७,२- ७० हजार
९०९९- ५० हजार
२०१९ - १ कोटी २५ लाख
२०२०- १ कोटी १० लाख
२०२१- ७० लाख (जून)