शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात काेयता गॅगचा राडा; फर्निचर कामगारांना मारहाण

By राजकुमार जोंधळे | Updated: April 25, 2024 19:56 IST

टाेळीतील दाेघांना पाेलिसांनी उचलले

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील सुभेदार रामजी नगरात हाता काेयता, तलवार घेत धमकावत एका फर्निचर दुकानाची माेडताेड, कामगारांना मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा चार ते पाच जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दाेघांना पाेलिसांनी उचलले असून, अन्य आराेपी पसार झाले आहेत.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील सुभेदार रामजी नगर परिसरात असलेल्या एका फर्निचरच्या दुकानात चार ते पाच जणांच्या टाेळीने हातात काेयता, तलवार, इतर शस्त्र घेऊन अचानक प्रवेश केला. दरम्यान, या टाेळीने फर्निचरच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कामगार स्वत:ला वाचविण्यासाठी पळापळ करत हाेते. टाेळीतील हे तरुण त्यांच्यामागे लागले.

यावेळी त्यांनी फर्निचर दुकानाचीही माेठ्या प्रमाणावर माेडताेड केली. घटनेनंतर टाेळीतील तरुण घटनास्थळावरून पसार झाले. याची माहिती एमआयडीसी पाेलिसांना मिळाली. घटनास्थळी पाेलिस कर्मचाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. पाेलिसांनी हाती लागलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून टाेळीतील तरुणांची ओळख पटविली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी दाेघांना तातडीने उचलले...

लातुरातील एका फर्निचरच्या दुकानात अचानकपणे घुसून हातात शस्त्र घेत कामगारांना मारहाण केल्याची घटना घडली हाेती. दरम्यान, बुधवारी घडलेल्या प्रकारानंतर पाेलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाेलिसांनी आराेपींची ओळख पटवत त्यातील दाेघांना तातडीने उचलले. इतर आराेपींच्या मागावर पाेलिस पथक आहे. - साहेबराव नरवाडे, पाेलिस निरीक्षक

सीसीटीव्ही फुटेज व्हायरलने खळबळ...

काेयता, तलवार हातात घेत कामगारांना मारहाण करणाऱ्या टाेळीचा प्रकार फर्निचर दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज साेशल मीडियात व्हायरल झाल्याने लातुरात एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा काेयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या टाेळीने डाेकेवर काढल्याची चर्चा लातुरात सुरू आहे.

परिसरात टाेळीची नागरिकांत दहशत...

लातुरातील दीपज्याेती नगर, सुभेदार रामजी नगर, शंभू नगर परिसरात भररस्त्यावर हातात शस्त्र घेऊन फिरणाऱ्या टाेळीचा वावर वाढला आहे. परिणामी, नागरिकांमध्ये सध्याला दहशतीचे वातावरण आहे. बिनदिक्कतपणे ही टाेळी हातात शस्त्र घेत स्थानिक नागरिकांना मारहाण करणे, धमकावत असल्याचे प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचे समाेर आले आहे.