शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

मोठा बदल, जागेचे वाद टाळण्यासाठी ग्रामपंचायतही मागविणार आता फेरफारवेळी हरकती!

By हरी मोकाशे | Updated: December 22, 2023 19:15 IST

कुठल्याही घराच्या जागेची नोंद ग्रामपंचायतीच्या नमुना नं. ८ मध्ये करणे बंधनकारक आहे.

लातूर : घरजागेच्या वादावरून नेहमीच वाद होतात. काही वेळेस ही प्रकरणे जिल्हा प्रशासनाबरोबरच न्यायालयापर्यंत पोहोचतात. परिणामी, त्यात वेळ जातो. तसेच, मानसिक ताणही सहन करावा लागतो. अशा प्रकारचे तंटे जिल्ह्यात निर्माण होऊ नयेत म्हणून जिल्हा परिषदेच्या सीईओंनी आता घरजागेच्या फेरफारची नोंद करतेवेळी हरकती मागविण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत.

कुठल्याही घराच्या जागेची नोंद ग्रामपंचायतीच्या नमुना नं. ८ मध्ये करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रत्येक जागामालक नोंदी करून घेत असतो. दरम्यान, काहीजण अधिकृत वाटणीपत्र, वारसा प्रमाणपत्र, संमतीपत्र, मृत्युपत्र अथवा खरेदीखत केलेले आवश्यक ते कागदपत्र न जोडता ग्रामपंचायतीच्या नमुना नं. ८ वर नोंदी करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेस स्थानिक दबावापोटी नोंदी होतात. मात्र ,तद्नंतर तक्रारी होऊन वाद निर्माण होतात. दरम्यान, अशा तक्रारींचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांनी नव्याने काही सूचना केल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात सुसंगतपणा व सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.

फेरफार अर्जांची होणार पडताळणी...फेरफारसाठीचा अर्ज दाखल झाल्यानंतर ग्रामसेवकाने नोंदवहीत नोंद करून पोहोच देणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीचा करभरणा केल्याची खात्री करून घ्यावी. अपूर्ण कागदपत्रे असल्यास सात दिवसांत लेखी पत्राद्वारे अर्जदारास कळवावे. फेरफारसाठीची आवश्यक ती कागदपत्रे जोडली असल्यास ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर त्याची माहिती डकवून हरकती मागवाव्यात.

हरकती आल्यास चौकशी करा...फेरफार अर्जासंदर्भात हरकती आल्यास सुनावणी घ्यावी तसेच चौकशी करावी. हरकती नसतील तर अर्ज मासिक सभेत ठेवावा. तद्नंतर कोणी विरोध केल्यास त्याची वरिष्ठ कार्यालयास माहिती द्यावी. मासिक सभेत फेरफार मंजूर झाल्यास त्याची फेरफार रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी.

ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात होणार वाढ...जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी शहरी भागाजवळ २३ ग्रामपंचायती आहेत. पाच हजार लोकसंख्येपेक्षा अधिक ग्रामपंचायतींची संख्या ४५ आहे. खुल्या जागेसाठी खरेदी खताच्या मूल्यांकनाच्या चार टक्क्यानुसार फेरफार शुल्क आकारले जाणार आहे. तर, बांधकाम केलेल्या जागेसाठी दोन टक्के शुल्क असणार आहे. तसेच, उर्वरित ग्रामपंचायती पाच हजार लोकसंख्येच्या आतील आहेत.

७१८ ग्रामपंचायती ५००० लोकसंख्येपेक्षा कमी...जिल्ह्यातील ७१८ ग्रामपंचायती या ५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या आहेत. त्यामुळे तिथे खुल्या जागेसाठी फेरफार शुल्क पाच टक्के, तर बांधकाम केलेल्या जागेसाठी २.५ टक्के फेरफार शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.

आता फेरफार शुल्क निश्चित...ग्रामपंचायतीत सुसंगतपणा व एकसूत्रता राहण्यासाठी फेरफार करतेवेळी घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात काही सूचना केल्या आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे कमी-जास्त फेरफार शुल्क राहणार नाही. त्याचबरोबर हरकती मागविल्यामुळे भविष्यात कुठलेही वाद निर्माण होणार नाहीत. या सूचनांचे ग्रामपंचायतींनी पालन करणे बंधनकारक आहे.- अनमोल सागर, सीईओ.

मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे...ग्रामपंचायतीच्या कारभारात सुसूत्रता येण्यासाठी सीईओ अनमोल सागर यांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याचे ग्रामपंचायत, सरपंच, नागरिकांनी पालन करावे.- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ.

प्रभावक्षेत्रातील ग्रामपंचायती २३५ हजारपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायती ४५५ हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायती ७१८

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgram panchayatग्राम पंचायत