शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

लातूर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; प्रस्थापितांना धक्का, नवीन गटांचा घ्यावा लागणार शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 18:00 IST

जिल्हा परिषदेच्या ६६ गटांचे आरक्षण जाहीर; चर्चित बाभळगाव गट अनुसूचित जातीतील महिलेसाठी आरक्षित

- हरी मोकाशे

लातूर : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या ६६ गटांचे गुरुवारी आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणामुळे काही प्रस्थापितांना धक्का बसला आहे. त्यामुळे आता त्यांना नवीन गटांचा शोध घ्यावा लागणार आहे. 

आरक्षणामुळे इच्छुक असलेल्या नवख्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार महेश परांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हे आरक्षण बालिकेच्या हस्ते चिठ्ठीद्वारे काढण्यात आले. दरम्यान, आरक्षणामुळे परंपरागत गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय मंडळींना आता नव्या गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे.

अनुसूचित जाती : खंडाळी, महापूर, चिंचोली (ब.), भादा, खरोसा, रोकडा सावरगाव.अनुसूचित जाती (महिला) : अंधोरी, हिसामाबाद, महाराणा प्रताप नगर, लामजना, उजनी, किल्लारी, पानचिंचोली.अनु. जमाती : मदनसुरी, अनु. जमाती (महिला), बाभळगाव.नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : हडोळती, कुमठा बु., हंडरगुळी, वडवळ नागनाथ, आर्वी, काटगाव, निवळी, निटूर, कासारशिरसी.नागरिकांचा मागास प्रवर्ग : नागलगाव, लोहारा, देवर्जन, निडेबन, चापोली, तांदुळजा, हलगरा, औराद शहाजानी.सर्वसाधारण (महिला) : शिरूर ताजबंद, किनगाव, माळहिप्परगा, नळगीर, बोरोळ, वलांडी, येरोळ, जानवळ, नळेगाव, पानगाव, गंगापूर, एकुर्गा, शिवली, आशिव, दापका, तांबाळा.सर्वसाधारण : वांजरवाडा, घोणसी, वाढवणा (बु.), मलकापूर, जवळगा, साकोळ, झरी (बु.), रोहिणा, खरोळा, कामखेडा, पोहरेगाव, मुरुड (बु.), आलमला, हासेगाव, मातोळा, अंबुलगा (बु.), बोरसुरी, सरवडी.

पुनर्रचनेत वाढले आठ गटनिवडणूक विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद गटांची पुनर्रचना करण्यात आली आहे. पूर्वी जिल्हा परिषदेचे ५८ गट होते. आता त्यात आठ गटांची भर पडली असल्याने ही संख्या ६६ वर पोहोचली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिक सदस्य पहावयास मिळणार आहेत.

जुन्या मोहऱ्यांची झाली अडचणगेल्या एक-दोन जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेले आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या काही माजी सदस्यांचे यापूर्वीचे गट आता पुनर्रचनेत बदलले आहेत. त्यामुळे या मोहऱ्यांना पुनर्रचनेतील नवीन गटात जाऊन चांगलीच तालीम करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

मातब्बरांचे गट झाले आरक्षितऔसा तालुक्यातील लामजना, भादा, उजनी, किल्लारी, शिरूर ताजबंद, पानगाव हे गट यापूर्वीच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारणसाठी खुले होते. मात्र ते आता आरक्षित झाल्याने येथील मातब्बर मंडळींना जिल्हा परिषदेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी नवीन गटाकडे धाव घ्यावी लागणार असल्याचे आरक्षणावरून दिसून येत आहे. त्यामुळे या मंडळींमध्ये नाराजी दिसून येत आहे.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषदElectionनिवडणूक