शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर पाणी टंचाईवर करणार मात; जलसाठा वाढीसाठी जिल्ह्यात ३८ अमृत सरोवरांची निर्मिती 

By हरी मोकाशे | Updated: August 8, 2022 16:55 IST

केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी ७५ जलाशये निर्माण करणे अथवा पुनर्जिवित करण्याचे उद्दिष्ट आहे.

लातूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्ह्यात अमृत सरोवर योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ३८ सरोवरांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे जलसाठ्यात वाढ होण्याबरोबर जमिनीत पाणी मुरण्यास मदत होणार आहे.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी ७५ जलाशये निर्माण करणे अथवा पुनर्जिवित करण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचे अमृत सरोवर योजना असे संबोधले जाते. प्रत्येक सरोवर हे किमान एक एकर आकारमानाचे व किमान १० हजार क्युबिक जलसाठ्याचे आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ९३ अमृत सरोवरांची निर्मिती अथवा पुनर्जिवित करण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, मृद व जलसंधारण विभागामार्फत ३८ अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत मनरेगामधून १० अमृत सरोवरांची निर्मिती सुरु आहे. या उपक्रमामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ३८ पैकी १५ आणि निर्माण होत असलेल्या १० अमृत सरोवर स्थळी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी