शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Latur: उदगीरमध्ये अनधिकृत खताचा साठा, विक्री; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:28 IST

उदगीरनजीकच्या निडेबन येथील कृष्णनगरात अनधिकृत खताचा साठा व विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास मिळाली.

लातूर/ उदगीर : उदगिरातील निडेबन येथे अनधिकृत खताचा साठा करून विक्री करण्यात येत असल्याचे समजल्याने कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी धाड टाकली. त्यात पाच लाख ६२ हजार ७५० रुपयांचे खत जप्त करण्यात आले. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरीप हंगामासाठी शेतकरी बी-बियाणे, खते खरेदी करीत आहेत. जिल्ह्यात कुठेही अनधिकृत बी-बियाणे, खते विक्री होऊ नयेत तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, उदगीरनजीकच्या निडेबन येथील कृष्णनगरात अनधिकृत खताचा साठा व विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास मिळाली. त्यावरून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दीपक सुपेकर, मोहीम अधिकारी मिलिंद बिडबाग, उदगीरचे उपविभागीय कृषी अधिकारी श्रेयस यादव, उदगीर पंचायत समितीचे कृषी अधिकारी बालाजी केदासे, तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, कृषी अधिकारी यशपाल सातपुते, गंगाराजू ऐनलवार, भांगे यांनी बुधवारी सकाळी सदर ठिकाणी धाड टाकली.

तेव्हा ज्ञानेश्वर दिगांबर कोहिले (रा. आंदेगाव, ता. मुखेड, जि. नांदेड) हा तिथे होता. त्याच्याकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता उज्जैन येथील कंपनीत तयार झालेल्या विविध प्रकारच्या खताची विक्री करीत असल्याचे सांगितले. तेव्हा कृषी अधिकाऱ्यांनी कंपनीचा खत निर्मिती परवाना, खत साठवणूक, विक्री परवान्याची चौकशी केली असता त्याच्याकडे काहीही आढळून आले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गोदामाची झडती घेऊन पाच लाख ६२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच खताचे नमुने तपासणीसाठी घेतले. याप्रकरणी कृषी विकास अधिकारी बालाजी केदासे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर कोहिले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र