शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

Latur: उदगीर शासकीय दूध योजनेचा चेंडू आता दिल्ली दरबारात, प्रकल्प पुनरुज्जीवन समिती सक्रिय

By आशपाक पठाण | Updated: August 19, 2023 20:32 IST

Latur: लातूर येथील बंद पडलेला शासकीय दूध भुकटी प्रकल्प पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी पुनरुज्जीवन समिती सक्रिय झाली आहे.

- आशपाक पठाण  लातूर - येथील बंद पडलेला शासकीय दूध भुकटी प्रकल्प पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी पुनरुज्जीवन समिती सक्रिय झाली असून, या समितीने उदगीरचे आमदार व क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे व खासदार सुधाकर शृंगारे यांच्या नेतृत्वाखाली  दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे शनिवारी भेट घेवून साकडे घातले. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रकल्प सुरू करण्यासाठी दिल्ली दरबारातील एन.डी.डी.बी. कडे प्रस्ताव पाठविण्यात यावा असे निर्देश दुग्धविकास सचिवांना दिले.

उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्प पूर्ववत सुरू करण्यासाठी दूध डेअरीसमोर उदगीरकरांची एक व्यापक बैठक झाली. तद्नंतर मंत्री संजय बनसोडे यांना दुग्धविकास मंत्र्याला सदर प्रकल्प चालू करण्याच्या संबंधात निवेदन देण्यात आले.

७ ऑगस्टला शासनाकडे सकारात्मक पाठपुरावा करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. १३ ऑगस्टला समितीने शिवाजी महाविद्यालयात मंत्री संजय बनसोडे यांच्याशी सार्वजनिक चर्चा करून आपले निवेदन दिले. १८ऑगस्ट रोजी मुंबई  दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन आपले निवेदन दिले.  मंत्री संजय बनसोडे यांनी सदर प्रकल्पाला लागेल तितका निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली. महानंद च्या संदर्भात महाराष्ट्र शासन एनडीडीबीकडे प्रस्ताव पाठवत आहे. त्याच धर्तीवर उदगीरच्या शासकीय दूध योजनेचा प्रस्ताव दिल्ली येथे पाठविण्यासंदर्भात दुग्धविकास सचिवांना निर्देश दिले. खा. सुधाकर शृंगारे यांनी या संदर्भात केंद्रीय दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही शिष्टमंडळास दिली.

हा प्रकल्प अशासकीय व्यवस्थेकडे  जाऊ देणार नसल्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली.  या समितीत आशिष पाटील राजूरकर, एस.एस .पाटील, नरेश सोनवणे, अजित शिंदे, अहमद सरवर, संतोष कुलकर्णी, शिवकुमार जाधव, मोतीलाल डोईजोडे, विनोद मिंचे, ओमकार गांजुरे, कपिल शेटकर व चंद्रकांत टेंगेटोल यांचा समावेश होता.

टॅग्स :milkदूधlaturलातूर