शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ लातूर कडकडीत बंद; बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट

By आशपाक पठाण | Updated: February 14, 2024 17:37 IST

सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सर्व आस्थापना, दुकानदार व काही शाळा, महाविद्यालयांनीही सहभाग घेतला.

लातूर : सगेसोयऱ्यांबाबत कायदा करण्यासाठी विशेष अधिवेशन बाेलावून तो मंजूर करावा, यासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार लातूर शहरासह जिल्ह्यात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. लातूर शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईसह इतर भागात दिवसभर शुकशुकाट होता.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, राज्य शासनाने सगेसोयऱ्यांबाबत कायदा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून त्याला मंजूर करावे, अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला लातूर शहरात बंद पाळून पाठिंबा देण्यात आला.

शाळा, महाविद्यालयेही बंद...सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी बंद पुकारण्यात आला होता. याला पाठिंबा दर्शविण्यासाठी लातूर शहरातील काही शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही सकाळी सोडून देण्यात आले. काही शाळांनी दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना सुटी दिली. शिवाय, मुख्य बाजारपेठ, आडत बाजार, भुसार लाइन, सराफ लाइन, कापड लाइन, हनुमान चौक, गंजगोलाई, महात्मा गांधी चौक, राजीव गांधी चौक, बार्शी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी भागात दिवसभर शुकशुकाट होता. सायंकाळी ५ वाजेनंतर शहरात नागरिकांची काहीअंशी वर्दळ सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन...लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन समाजबांधवांनी बंदचे आवाहन केले. यास प्रतिसाद देत शहरातील व्यापारी, शाळा, दुकाने आदी आस्थापनांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

चौका-चौकात पोलिस बंदोबस्त...सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सर्व आस्थापना, दुकानदार व काही शाळा, महाविद्यालयांनीही सहभाग घेतला. मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य शासनाने तत्काळ मार्गी लावाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. बंदला काही गालबोट लागू नये, यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन रेणापूर नाका, जुना नाका, राजीव गांधी चौक, स्वामी विवेकानंद चौक, नंदी स्टॉप, बार्शी रोड, गंजगोलाई, गूळ मार्केट, महात्मा बसवेश्वर चौक आदी भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :laturलातूरMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील