शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Latur: किराणा दुकानावरील छाप्यात दीड लाखांचा गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा

By आशपाक पठाण | Updated: January 25, 2024 21:49 IST

Latur News: निलंगा शहरातील शिवाजीनगर भागातील दोन किराणा दुकानांमध्ये पोलिसांनी छापा टाकून १ लाख ३७ हजाराचा गुटखा बुधवारी जप्त केला आहे. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुरूवारी सायंकाळी दोन्ही दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- आशपाक पठाण निलंगा (जि.लातूर): शहरातील शिवाजीनगर भागातील दोन किराणा दुकानांमध्ये पोलिसांनी छापा टाकून १ लाख ३७ हजाराचा गुटखा बुधवारी जप्त केला आहे. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुरूवारी सायंकाळी दोन्ही दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांनी सांगितले, गुटखा व सुगंधी तंबाखूवर महाराष्ट्रात बंदी असतानाही शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेशातून चोरटी वाहतूक करून शहरात सर्रास गुटखा विक्री चालू आहे. याबाबतची माहिती निलंगा पोलिसाला मिळताच बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास हाडगा नाका भागातील विठ्ठल संभाजी जाधव यांचे विठ्ठल किराणा स्टोअर्स येथे छापा मारून ४५ हजार २९९ रूपयांचा विविध प्रकारच्या नमुनाच्या गुटखा जप्त करण्यात आला. यावेळी दुकानदार फरार झाला. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. पी. गायकवाड करीत आहेत. तसेच याच भागातील अंकुश पाटील यांच्या वैष्णवी किराणा दुकानावर छापा मारला असता ९२ हजार २६५ रूपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त करून ठाण्यात जमा केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. शेजाळ हे तपास करत असून दुकानदार फरार आहे. याबाबत अन्न व भेसळ सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांच्या फिर्यादीवरून वरून विठ्ठल संभाजी जाधव, अंकुश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शेजारच्या राज्यातून आवक...निलंगा तालुक्याला लागूनच कर्नाटक बॉर्डर असल्यामुळे बसवकल्याण, भालकी, बिदर येथून मोठ्या प्रमाणामध्ये गुटख्याची चोरटी आवक होत असते. त्यामुळे निलंगा शहरात गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. बंदी असताना गुटखा येतोच कसा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी