शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

लातूरकरांना आता पालिकेत रांग लावायची गरज नाही; शुल्क भरण्यापासून ५२ सेवा ऑनलाइन

By हणमंत गायकवाड | Updated: March 12, 2024 17:04 IST

आपले सरकारशी संलग्न करण्याचे काम अंतिम टप्प्यात

लातूर : महानगरपालिकेच्या अनेक सेवा आता ऑनलाइन होणार आहेत. त्यामुळे संगणक, प्रिंटर दुरुस्ती व देखभालीसाठी मनपाने अंदाजपत्रकात ९१ लाखांची तरतूद केली आहे. जवळपास ५२ सेवा ऑनलाइन होणार असून, यामुळे नागरिकांना मनपात येण्याची गरज लागणार नाही.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अन्वये लातूर शहर महापालिकेमार्फत नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ५२ सेवांचा लाभ घेता येणार आहे. याकरिता महानगरपालिकेचे नवीन पोर्टल अद्ययावत करण्यात येत आहे. शिवाय, आपले सरकारशी लिंकिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जन्म प्रमाणपत्र देणे, मृत्यू प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, बांधकाम परवाना देणे, जात प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र यासारखी प्रमाणपत्रे नागरिकांना ऑनलाइन मिळणार आहेत.

शुल्क भरण्यासाठी मनपात यावे लागणार नाही...सध्या या प्रमाणपत्राचे वितरण ऑनलाइन असले तरी शुल्क भरण्यासाठी महानगरपालिकेत यावे लागत आहे. मात्र, पुढील पंधरा दिवसांत नवीन पोर्टल अद्ययावत झाल्यानंतर महानगरपालिकेत येण्याची गरज लागणार नाही. घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरता येईल आणि प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. दरम्यान, या सेवेचा लाभ लातूर शहरातील नागरिकांना पंधरा दिवसांनंतर मिळेल, असे महानगरपालिकेतून सांगण्यात आले.

या सेवा मिळणार ऑनलाइन....जन्म प्रमाणपत्र देणे, मृत्यू प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, बांधकाम परवाना देणे, जात प्रमाणपत्र देणे, भोगवटा प्रमाणपत्र, अग्निशमन ना हरकत दाखला देणे, अग्निशमन अंतिम ना हरकत दाखला देणे, मालमत्ता कर उतारा देणे, थकबाकी नसल्याचा दाखला देणे, नव्याने कर आकरणी, कराचे मागणी पत्र तयार करणे, कर माफी मिळणे, स्वयंमूल्यांकन, आक्षेप नोंदविणे, नवीन परवाना मिळणे, परवान्याचे नूतनीकरण, परवाना हस्तांतरण, परवाना दुय्यम प्रत, व्यवसायाचे नाव बदलणे, व्यवसाय बदलणे, परवाना रद्द करणे, कालबाह्य परवान्यासाठी नूतनीकरण सूचना, नवीन जाहिरात अवकाश चिन्ह, परवाना व नूतनीकरण, व्यवसाय परवाना नूतनीकरण आदी ५२ सेवा ऑनलाइन मिळणार आहेत.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिकाTaxकर