शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या पुरवणी परीक्षेत लातूर बोर्डाचा २८.५० टक्के निकाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 21:19 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी पुरवणी परीक्षेचा लातूर बोर्डाचा निकाल २८.५० टक्के लागला आहे. लातूर विभागीय मंडळाअंतर्गत ९ हजार ६८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी पुरवणी परीक्षेचा लातूर बोर्डाचा निकाल २८.५० टक्के लागला आहे. लातूर विभागीय मंडळाअंतर्गत ९ हजार ६८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी २ हजार ७५९ उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतून ९ हजार ६८० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. नांदेड जिल्ह्यात ५ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी १ हजार ६३६ उत्तीर्ण झाले. त्यात विशेष प्राविण्यात १, प्रथम श्रेणीत ५, द्वितीय श्रेणीत १७, तर उत्तीर्ण १ हजार ६१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्ह्याचा निकाल ३०.१८ टक्के लागला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात २ हजार १२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ४६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विशेष प्राविण्यात १, प्रथम श्रेणीत २, द्वितीय श्रेणीत ९ तर ४५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याची टक्केवारी २१.८८ अशी आहे. तर लातूर जिल्ह्यातून २ हजार १३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ६५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात प्रथम श्रेणीत १, द्वितीय श्रेणीत ५ तर ६५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर जिल्ह्याचा निकाल ३०.८३ टक्के लागला आहे. या परीक्षेत ६ हजार ८१९ मुले तर २ हजार ८६१ मुलींनी परीक्षा दिली होती. पैकी १ हजार ८३२ मुले तर ९२७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्णतेत मुलांची २६.८७, तर मुलींची टक्केवारी ३२.४० आहे. याही परीक्षेत मुलांपेक्षा मुलीच सरस आहेत.

टॅग्स :laturलातूरexamपरीक्षा