शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धूरमुक्त होणार प्रवास, लातूर जिल्ह्याला ७५ इलेक्ट्रिकल बसेस मिळणार!

By हणमंत गायकवाड | Updated: August 18, 2023 18:14 IST

लातूर बसस्थानक क्रमांक दोनमध्ये मुख्य चार्जिंग स्टेशन

लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हायटेक होत असून, यंत्रणा अत्याधुनिक करण्यावर भर आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता लातूर विभागात नव्या-कोऱ्या इलेक्ट्रिकल बसेस प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. १०३ गाड्यांचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून, किमान ७५ बसेस मंजूर होतील, असा विश्वास विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी व्यक्त केला आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत इलेक्ट्रिकल बसेस लातूर विभागाला मिळतील. त्यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग पॉईंट करण्यात येत आहेत. तर रेणापूर नाका बसस्थानक दोन येथे मुख्य चार्जिंग स्टेशन असेल. औरंगाबाद विभागाला इलेक्ट्रिकल गाड्या मिळालेल्या आहेत. त्याच धर्तीवर लातूर विभागालाही मिळणार आहेत. २५० ते ३०० किलोमीटर क्षमतेची बॅटरी या गाड्यांना असणार आहे. या गाड्या दोन प्रकारच्या आहेत. २५० किलोमीटर अंतरापर्यंत धावेल इतकी क्षमता असणारी बॅटरी एका गाडीला आहे. तर दुसऱ्या प्रकारच्या गाडीकडे तीनशे किलोमीटर अंतर धावेल इतकी क्षमता असणारी बॅटरी आहे.

पाचही आगारांमध्ये चार्जिंग पॉईंट...जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर या पाचही आगारांमध्ये इलेक्ट्रिकल गाड्यांसाठी चार्जिंग पॉईंट असणार आहे. बॅटरी उतरल्यानंतर चार्जिंग करण्यासाठी प्रत्येक आगारात अत्याधुनिक सोय केली जात आहे.

४२ लाख रुपयांचा नफा....नाविन्यपूर्ण योजना आणि आधुनिकतेमुळे लातूर विभागाला गेल्या तीन महिन्यांमध्ये ४२ लाख दहा हजार रुपयांचा नफा झाला आहे. एप्रिल ते मे या कालावधीतील हा नफा असून, वेगवेगळ्या योजनांमुळे एसटी तोट्यातून नफ्यात येत असल्याचेे विभाग नियंत्रक जानराव म्हणाले.

लातूर आगाराच्या बसेस धूरमुक्त...सद्यस्थितीत लातूर आगारातील १४ बसेस स्क्रॅप करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्यांचे इंजिन बदलण्यात आले आहे. पंधरा वर्षांच्या पुढील कालावधीची एकही बस लातूर विभागात नाही. त्यामुळे एकही बस धूर सोडणारी नाही. आरटीओ नियमानुसार गाड्यांची कंडिशन आहे. नव्या गाड्यांची भर पडली आहे. आता डिसेंबरअखेर इलेक्ट्रिकल बसेसही मिळतील, असे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरstate transportएसटीtourismपर्यटन