शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

Latur: देवणीत हिंस्र प्राण्याचा थरार! हल्ल्यात सहा जण जखमी, सर्वांच्या डोळे-डोक्याला इजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:14 IST

सर्वांच्याच डोळ्याला व डोक्याला इजा झाली असून, त्यांना उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

- रमेश कोतवालदेवणी (जि. लातूर) : लातूर जिल्ह्यातील देवणी व परिसरात शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास एका हिंस्र प्राण्याने पाच ते सहा जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. सर्वांच्याच डोळ्याला व डोक्याला इजा झाली असून, त्यांना उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

देवणी येथील पंचायत समिती परिसरात या हिंस्र प्राण्याने युनूस सरदारमियां मिर्झा (५५) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर इनाया इस्माईल मल्लेवाले या तीन वर्षांच्या मुलीवर हल्ला केला. तेथून हा प्राणी देव नदीच्या किनारी फिरत असताना फैजान फिरोज येरवळे (९ वर्षे) या मुलावर हल्ला करून त्याला जखमी केले. त्यानंतर हा प्राणी देव नदीच्या पलीकडे शेतावर गेला. तेथे चन्नाप्पा राजाप्पा भदशेट्टे (वय ५५) यांना जबर जखमी केले. पुढे मार्गस्थ होत असताना हा प्राणी कोतवाल यांच्या शेतीजवळ आला. तेथे गोविंदराव माणिकराव म्हेत्रे यांच्यावर हल्ला केला. तेथून हा प्राणी उत्तर दिशेला शेतशिवारात निघून गेला. दरम्यान, सहा लोकांना हिंस्र प्राण्याने जखमी केले. एकाचे नाव समजले नाही.

हिंस्र प्राण्याबाबत संभ्रम; तरस असल्याची शक्यताहा हिंस्र प्राणी लांडगा की कोल्हा, असा सुरुवातीला समज निर्माण झाला होता. मात्र याचवेळी उमरगा तालुक्यातील वाहतूकदार कामानिमित्त देवणी येथे आले असता त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी हा प्राणी तरस असावा अशी शक्यता वर्तविली. त्यांच्या म्हणण्यानुसार केरळ राज्यातून हा प्राणी उमरगा तालुक्यात आणून सोडला, तेथेही असाच धुमाकूळ या प्राण्याने केला असल्याचे सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी दिसल्याची चर्चाया घटनेमुळे देवणी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्राण्याबद्दल अनेक प्रकारची माहिती समोर येत आहे. येथील डॉ. संजय अटर्गेकर यांनी १५ दिवसांपूर्वी निलंगा-उदगीर या राज्य रस्त्यावर अजनी पाटीजवळ रात्री ९ वाजेच्या सुमारास या प्रकारचे प्राणी आढळल्याचे सांगितले. पंधरा दिवसांत दोनदा असे प्राणी आढळले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी देवणी परिसरातील नागरिकांनी केली.

वन विभागाची देवणी परिसरात गस्तदेवणी परिसरामध्ये वनविभाग आणि पोलिसांकडून गस्त सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नाही. वनविभागाशी संपर्क करावा. हल्ला केलेला हिंस्र प्राणी तरस किंवा अन्य कुठला आहे, याबाबत कळणे शक्य नाही. जे छायाचित्र प्राप्त झाले आहे, त्यावरूनही ते कळत नाही. आता वनविभागाची सहा लोकांची टीम लातूरहून देवणी परिसरात आलेली आहे. ज्या दिशेने तो प्राणी गेला आहे त्या दिशेनेही वनविभाग लक्ष ठेवून आहे, अशी माहिती देवणी तालुक्याचे वनरक्षक एस. आर. घोगरे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Wild animal terror in Devni, six injured in attack.

Web Summary : A wild animal attacked six people in Devni, Latur, injuring their heads and eyes. Victims are hospitalized in Udgir. The animal, possibly a hyena, sparked panic. Forest department investigates.
टॅग्स :laturलातूरforest departmentवनविभाग